- विनोद पुनामिया आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सायकलपटू म्हणून विनोद पुनामिया प्रसिद्ध आहेत. पण, एक लघुव्यावसायिक म्हणूनही त्यांचा दबदबा आहे. घरातील व्यावसायिक वातावरणाची चाकोरी मोडत ते काही कारणांमुळे सायकलिंगकडे वळले. पुढे चिंध्यांपासून हेअर रबरबॅण्ड, इमिटेशन ज्वेलरी, सायकल, तिचे सुटे भाग आणि आता खड्यांपासून काही आभूषणे, हेअर अॅसेसरिज, कपडे व चपलांवरील डिझाइन्स बनवण्याच्या व्यवसायात जम बसवला आहे. चीनमधून त्यांनी त्यासाठी खास मशीन व डाय आयात केले. त्यासारखीच मशीन डोंबिवलीत बनवली. त्याद्वारे उत्पादित होणारा माल ते चीनमधून आयात होणाऱ्या मालाच्या तुलनेत स्वस्तात विकत आहेत. यामुळे २०० महिलांना रोजगार मिळाला आहे. ‘मेड इन इंडिया’चा अभिमान बाळगताना त्यांनी आता थेट चीनशीच युद्ध पुकारले आहे.राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील गुंडोज गावातील माझा जन्म. मी शाळेत मस्तीखोर होतो. मला अभ्यासाची आवड नव्हती. कसाबसा आठवी पास झालो. व्यवसाय व एकत्रित कुटुंबामुळे वडिलांवर अनेक जबाबदाऱ्या होत्या. माझ्यात सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी मला १९७९ मध्ये मुंबईला शिकायला पाठवले. नववीत मी तीनदा नापास झालो. त्यामुळे वडिलांनी मला शाळेतून काढले. मेकॅनिकल फिल्डमधील रुचीमुळे मी एकदोन कारखान्यांत काम केले. पण, तेथे मी १०-२० पैसे चोरत असे. त्यामुळे वडिलांनी हाकलून दिले. १९८२ मध्ये मी १६-१७ वर्षांचा होतो. दोनपाच रुपयांसह घर सोडले. एका मित्राच्या घरी गेलो. शिक्षण नसल्याने तुला नोकरी कोण देणार, असा सवाल त्याने केला. तेलगल्लीत एका मारवाडी कुटुंबाकडे मी १५० रुपयांवर धुणीभांडी केली. दोन वर्षे काम केले. पुढे जगायचे कसे, या प्रश्नाने मला छळले. माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला. त्यासाठी व्हीटी स्थानक गाठले. पण, मागे फिरलो. काहीतरी केले पाहिजे, याची जाणीव झाली. मालकाला काम सोडत असल्याचे सांगितले. त्याने माझ्या कामाचे २००-३०० रुपये दिले. ते घेऊन मी व्हीटी स्थानकात येऊन पुणे गाडी पकडली.पुण्यात कोणाचीच ओळख नव्हती. दुकानात काम शोधताना एका झेरॉक्सवाल्याने मला ५०० रुपयांवर कामाला ठेवले. रात्री दुकानाबाहेर झोपू लागलो. दुकानाशेजारील राजेश कनगुटकर यांच्याकडे एकदा ‘दूरदर्शन’वरील क्रीडांगणमध्ये सायकल स्पर्धा पाहिली. आपणही स्पर्धेत सहभागी व्हावे, असे वाटत होते. पण, सायकल कोण देणार, शिकवणार कोण, स्पर्धेत सहभागी कसे व्हायचे, असे प्रश्न माझ्यापुढे होते. पहिला पगार झाल्यावर हप्त्यावर सायकल घेतली. त्यावर, पाच-सहा महिने माझ्या परीने सराव केला. एक दिवस सकाळी हाय वेवर सरावाला गेलो. तेथे सायकलचालकांचा ग्रुप पाहून हुरूप आला. पण, त्यांनी माझी खिल्ली उडवली. दोनतीन दिवसांनी पुन्हा गेलो. त्या वेळी राष्ट्रीय सायकलपटू प्रमोद वाघमारे भेटले. त्यांना माझी कहाणी सांगताच त्यांनी मला त्यांच्याकडे आसरा दिला. माझ्यातील टॅलंट ओळखून मला प्रशिक्षण दिले. १४ एप्रिल १९८५ ला पहिल्यांदा मी पुण्यातील बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफीमध्ये सहभागी झालो. राष्ट्रीय, राज्यपातळीवरील १००-१५० खेळाडू असतानाही मी पहिला क्रमांक पटकावला. पहिल्या फेरीतच मी सायकलिंगचा श्रीगणेशा केला. तीनदा मुंबई-पुणे सायकल स्पर्धा, राज्य पातळी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सायकल स्पर्धा, ट्रायथॉलन आदी स्पर्धा जिंकल्या.लग्नानंतर हाती फक्त १० हजार होते. घर चालवायचे कसे, असा प्रश्न माझ्यापुढे होता. मग कोल्हापुरात लॉटरीची तिकिटे विकली. उरलेली शेवटची मी घ्यायचो. त्यात मला बक्षीस लागे. या पैशांतून मी मुंबईहून काशाची भांडी आणून घरोघरी विकू लागलो.१९९९ ला डोंबिवलीत आलो. चुलत भावाच्या गारमेंट व्यवसायात कामाला लागलो. मी कचऱ्यात व्हेलवेटच्या ब्लाउजच्या चिंध्या पाहिल्या होत्या. त्या घरी आणल्या. पत्नीने त्या कापून हेअर रबर बॅण्ड बनवला. तो डोंबिवली बाजारात १०० रुपये डझन, तर दादरला १२० रुपयांना विकला. पुढे उल्हासनगरातील कारखान्यात झाडू मारून चिंध्या गोळा केल्या. पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवून शिलाई मशीन विकत घेतले आणि रबर बॅण्ड बनवले. त्यातून मशीनचा खर्च निघाला. माझे यश पाहून काही व्यापारी चौकशी करत उल्हासनगरला पोहोचले. या व्यवसायाने मला तारले. शब्दांकन : आमोद काटदरेलहान उद्योजकांना फायदा नाही : ‘मेक इन इंडिया’ची घोषणा जरी सरकारने केली असली तरी लहान उद्योजकांना त्याचा काहीच फायदा होत नाही. सरकारने किंवा स्थानिक प्रशासनाने साथ दिल्यास डोंबिवलीत एक हजार जणांना रोजगार देण्याची माझी तयारी आहे. या व्यवसायातून त्यांना फायदा होऊ शकतो.इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसायसायकलिंगबरोबरच मी इमिटेशन ज्वेलरीकडे वळलो. केसांच्या क्लिप विकू लागलो. चीनमधून मी त्याच्या नवीन डिझाइन आणल्या. तेथून चमकणारा व्हेलवेटसारखा कागद आयात केला. तो रंगांनुसार डाय करून तो क्लिपवर चिकटवून त्या विकल्या. खड्यांपासून बनवलेली आभूषणे मी बनबून विकली. मी या व्यवसायात पायोनियर होतो. पण, अन्य व्यापारी व्यवसायात उतरल्याने मला स्पर्धक निर्माण झाले.डेक्कन क्वीनशी स्पर्धा २००५ मध्ये मला पुन्हा सायकलने खुणावले. मी १९८५ ला डेक्कन क्वीनशी स्पर्धा करण्याचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्ण करण्यासाठी पत्नीच्या परवानगीने मी सिंगापूरहून सायकल आणली. पहाटे ३ वाजता उठून सायकलिंगचा सराव करू लागलो. अखेर, २५ मार्च २००७ ला मी पुणे-मुंबई अशी डेक्कन क्वीनशी स्पर्धा करत एक विक्रम केला. मला सर्वांनी डोक्यावर घेतले. २००८ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी २६ ते ३० जानेवारी २००९ अशी पाच दिवशांची मुंबई-दिल्ली सायकलस्वारी केली. पुढे २०११ मध्ये दिल्ली ते मुंबई सायकलने ३१ तासांत पार करण्याचा विक्रम केला. आता ६० व्या वर्षी मुंबई-अहमदाबाद किंवा बडोदा-अहमदाबाद अंतर सायकलने विक्रमी वेळेत पार करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.खड्यांच्या दागिन्यांचा ट्रेण्डइमिटेशन ज्वेलरीनंतर मी परदेशातून सायकल व सुटे भाग आणून विकू लागलो. पण, यश मिळाले नाही. त्यामुळे इमिटेशन ज्वेलरीकडे वळायचे तर नवीन काय करायचे, याचा विचार सुरू होता. त्या वेळी बाजारात खड्यांचे दागिने प्रसिद्ध झाले होते. त्याचे साहित्य मिळवण्यासाठी मी चीनला गेलो. पण, हाती काही लागत नव्हते. भाषेच्या अडचणीमुळे कोण कारखानदार मदत करणार, यामुळे बेजार झालो होतो. वर्षभर चीन दौरे झाले. त्यासाठी सोने गहाण ठेवले. एकदा चीनमध्ये मी एकाला खड्याची मोठी शीट-चटई घेऊन जाताना पाहिले. त्याचा पाठलाग करून कारखान्यापर्यंत पोहोचलो. कारखानदाराने मला खड्यांची शीट करून देण्याची तयारी दर्शवली. पण, ती शीट गोलाकार, वर्तुळाकार टठकापणे शक्य नव्हते. भारतीय आभूषणांसाठी ते आवश्यक होते. मग, मी त्यांच्याकडून डाय तयार करून घेतली. पण, चीनमधील उत्पादकाने माझीच डायची डिझाइन भारतातील अन्य उत्पादकांना विकली. मी ३० हजार खर्चून मी खड्यांचे डिझाइन तयार करण्यासाठी तेथून मशीन आयात केली. त्यावर, २०० टक्के कर लागला. त्यामुळे आता मी तशीच मशीन बनवली आहे. त्याद्वारे विविध उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे २०० महिलांना रोजगार मिळाला आहे. चीनमधून माल आयात करण्यास लागणाऱ्या पैशांपेक्षा मी तो स्वस्तात बनवून विकत आहे. चीनविरोधातील हा माझा लढा आहे. त्यामुळे आज मालाड, मुंबईतील व्यापारी माझ्याकडे माल खरेदीसाठी येत आहेत.
आता थेट चीनशीच युद्ध
By admin | Published: August 16, 2016 4:34 AM