शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
6
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
7
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
8
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
9
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
10
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
11
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
13
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
14
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
15
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
16
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
17
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
18
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
19
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
20
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार

नृत्यसंस्कार विश्वविक्रमासाठी सज्ज

By admin | Published: January 10, 2015 12:34 AM

सुप्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार जयलक्ष्मी इश्वर व एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अशोक पाटील हे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

कोल्हापूर : भरतनाट्यम ही तमिळनाडूची नृत्यशैली, मात्र या शैलीत विश्वविक्रम करण्याचा मान महाराष्ट्रातल्या कोल्हापूरला मिळाला आहे. मावळत्या सुर्याच्या साक्षीने उद्या दुपारी चार वाजता शनिवारी तपस्या सिद्धी कलाअकादमी प्रस्तूत नृत्यसंस्कार हा नृत्यांगणा संयोगितापाटील सह महाराष्ट्रातील दोन हजार नृत्यांगणांचा पदन्यास होईल. गिनेस बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद होवून कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानााच तुरा खोवला जाणार आहे. या विश्वविक्रमाची रंगीत तालीम आज शाहु स्टेडिअमवर झाली. गेल्या दीड वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर उद्या हा विश्वविक्रमचाा संकल्प साकारला जात आहे. त्यासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील दोन हजार १०० नृत्यांगणा कोल्हापूरात दाखल झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शाहू स्टेडिअमवर विक्रमासाठीची रंगीत तालीम केली जात आहे. उद्या दुपारी ४ वाजता विश्वविक्रमाच्या नृत्याचे सादरीकरण होईल.यावेळी गिनेस बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी फोर्च्यूना बुर्क कोल्हापूरात आले आहेत. या कार्यक्रमास महापौर तृप्ती माळवी, श्रीमंत शाहु महाराज, डॉ. पतंगराव कदम, खासदार धनंजय महाडीक, आमदार चंद्रकांत पाटील, राजेश क्षिरसागर, चंद्रदीप नरके, अमल महाडीक, उद्योगपती संजय घोडावत, माजी मंत्री सतेज पाटील उपस्थित राहणार आहे.सुप्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार जयलक्ष्मी इश्वर व एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अशोक पाटील हे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय संयोगिताचे गुरू पंडीत टी. रविंद्र शर्मा, प्रथम गुरू अमृता जांबोलीकर, एम.एम. साठी, डॉ. संध्या पुरेचा हे उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक ५० मुलींच्या ग्रूप मागे एक व्यक्ती स्वयंसेवक निरीक्षणासाठी असेल. या विक्रमात कोल्हापूरसह पुणे, नगर, संगमनेर, पलूस, मुंबई, अहमदनगर गुजरात, बेंगलोर, चेन्नई, कर्नाटक, बेळगाव येथील कलाकार सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)कार्यक्रमाची रुपरेषा अशी दुपारी ४ वाजता विश्वविक्रमाचे मुख्य नृत्य सादर होईल. त्यानंतर गणेशवंदना, धनश्री शर्मा हिचे भरतनाट्यम नृत्य, देश अभिमान, महाराष्ट्र गीत यासह कोल्हापूर व या कार्यक्रमावर आधारित पोवाड्याचे सादरीकरण, नंतर पुन्हा एकदा सर्व नृत्यांगणांचे सादरीकरण.. यानंतर गिनेस बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा. तमिळनाडूत यापूर्वी भरतनाट्यममध्ये विविध ग्रूप शो आणि प्रयोग झाले आहेत. पण विश्वविक्रम करण्याचा मान कोल्हापूरला मिळणार आहे. हा विक्रम फक्त माझा नाही तर अवघ्या कोल्हापूरकरांचा आहे. या सादरीकरणाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे- संयोगिता पाटील (नृत्यांगणा)