नवी दिल्ली: महाराष्ट्रासाठी खूप मोठा दिलासा देणारी बातमी आहे. राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयांने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात राज्यात 661 रुग्णांची नोंद झाली आहेत तर केवळ 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी ही गेल्या काही महिन्यातील सर्वात कमी आकडेवारी आहे.
आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात राज्यामध्ये एकूण 896 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून सध्या 14 हजार 714 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 97.6 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात 1,48,880 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 968 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशातील एकूण रुग्णसंख्या आटोक्यातदेशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. शुक्रवारी, गेल्या 24 तासात कोरानाच्या 12,729 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, या दरम्यान 221 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. बरे होण्याचा दर सध्या 98.23% आहे, जो मार्च 2020 नंतरचा उच्चांक आहे. गेल्या 24 तासांबद्दल बोलायचे झाल्यास, 12, 165 लोक कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत आणि बरे झालेल्या लोकांची संख्या 3,37,24,959 वर पोहोचली आहे.
सध्या, देशात सक्रिय प्रकरणांची संख्या एकूण प्रकरणांपैकी फक्त 1 टक्के आहे, ही संख्या मार्च 2020 नंतर सर्वात कमी आहे. देशात सध्या कोरोनाचे 1,48,922 सक्रिय रुग्ण आहेत. दैनिक पॉझिटिव्हीटी रेट 1.90% आहे. चांगली गोष्ट म्हणजे गेल्या 32 दिवसांपासून हा आकडा दोन टक्क्यांच्या खाली जात आहे. तर, साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 1.25% आहे, हा आकडा देखील गेल्या 42 दिवसात दोन टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. देशात आतापर्यंत 107.70 कोटी लोकांचे लसीकरण झाले असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.