शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 6:40 AM

दिवसभरात ४१६ मृत्यू; बरे झालेल्यांची संख्या दहा लाखांच्या जवळ

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शुक्रवारी १७ हजार ७९४ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाल्याने एकूण रूग्णसंख्या १३ लाख ७५७ झाली. तर, सध्या २ लाख ७२ हजार ७७५ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात १९ हजार ५९२ रूग्णांना घरी सोडण्यात आले असून कोरोनामुक्तांची संख्या ९ लाख ९२ हजार ८०६ इतकी झाली आहे.

राज्यात सध्या कोरोनामुळे होणारा मृत्युदर २.६७ टक्के आहे. आज दिवसभरात ४१६ मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत ३४,७६१ जणांचा मृत्यू झाला. आजच्या ४१६ मृत्युंपैकी २२८ हे मागील ४८ तासांतील आहेत, तर १०६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत, तर ८२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. ८२ मृत्युंपैकी सर्वाधिक २२ नाशिकमधील, तर कोल्हापूर १२, पुणे ११, अहमदनगर ६, औरंगाबाद ५, नागपूर आणि सातारा प्रत्येकी ४, जळगाव आणि परभणी प्रत्येकी ३, वर्धा, रायगड आणि पालघरमध्ये प्रत्येकी २ तर, अमरावती, बीड, लातूर, रत्नागिरी, सांगली, ठाणे येथील प्रत्येकी १ मृत्यू आहे. १९ लाख २९,५७२ होम क्वारंटाइन, तर ३२,७४७ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत आज कोरोना रुग्णसंख्येत घटगेले काही दिवस दररोज दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने मुंबईत भीतीचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारी रुग्ण संख्येत घट झाली असून, दिवसभरात १,८६३ बाधितांचे निदान झाले. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर १.११ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी २,१६३ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी १,१६९ रुग्ण बरे झाले. यामुळे आतापर्यंत ८१ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर दिवसभरात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ८,७०३ झाला आहे. पालिकेच्या अहवालानुसार, सध्या २८ हजार २७३ सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत एक लाख ५६ हजार ८०७ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण बाधितांचा आकडा एक लाख ९४ हजार १७७ एवढा आहे, तर आतापर्यंत दहा लाख ५७ हजार ६४० चाचण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या