शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

गुंतवणुकीचा आकडा खरा की फुगविलेला?

By admin | Published: August 09, 2015 2:36 AM

तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण भारतात येत्या १०वर्षांत दोन अब्ज डॉलरची मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी

मुंबई : तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी आपल्या मुलाखतीमध्ये संपूर्ण भारतात येत्या १०वर्षांत दोन अब्ज डॉलरची मानस व्यक्त केला होता. गाऊ यांची ती मुलाखत खरी मानायची की ही कंपनी येत्या पाच वर्षात एकट्या महाराष्ट्रात पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे खरे मानायचे, मानायचे असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील देवेंद्र फडवणीस सरकार आल्यानंतर ‘मेक इन इंडिया’सारख्या घोषणा सतत ऐकावयास मिळत आहेत. राज्यामध्ये गुंतवणूक आणण्याकरिता अनेक देशांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री सहकुटुंब दौरे करत आहेत, प्रत्येक दौऱ्यानंतर राज्यावर हजारो कोटींच्या गुंतवणुकीच्या घोषणांचा वर्षाव पहावयास मिळतो. पण प्रत्यक्षात वास्तव वेगळेच आहे, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.मुख्यमंत्र्यांनी फॉक्सकॉन कंपनी आणि राज्य सरकार यांच्यात पाच अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा सामजस्य करार झाल्याचे जाहीर केले. त्या संदर्भात बोलताना चव्हाण असेही म्हणाले की, गुंतवणुकीचा हा आकडा जनतेची दिशाभूल करण्याकरिता वाढवून सांगितलेला नसावा आणि खरोखरच एवढ्या प्रमाणात गुंतवणूक यावी अशी कॉंग्रेस पक्षाची अपेक्षा आहे आपल्या या म्हणण्याचे अधिक स्पष्टिकरण देताना चव्हाण म्हणाले, दोन तीन दिवसांपूर्वी याच टेरी गाऊ यांनी एका मुलाखतीमध्ये संपूर्ण भारत देशात दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक पुढील १० वर्षात करण्याचा मानस व्यक्त केला होता. तसेच सदर गुंतवणूक ही एकाच प्रकल्पात नव्हे तर अनेक सामंजस्य करारान्वये केली जाईल. म्हणजे अनेक कंपन्यांबरोबर विविध प्रकल्पांद्वारे ही गुंतवणूक नरेंद्र मोदी यांचे सरकार जर पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणत असेल तर केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. दोन दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या उद्योगसमूहाचा मानस बदलला असेल तर त्याचे आपण स्वागतच करतो असेही चव्हाण म्हणाले. परंतु नरेंद्र मोदी सरकारची आणि एकंदरच भाजप सरकारची मानिसकता ही अतिरंजीत आश्वासने व प्रत्येक विषयाचे मार्केटिंग करण्याची राहिलेली आहे. २००३ पासून २०११ पर्यंत नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले होते. परंतु त्यापैकी फक्त आठ टक्केच गुंतवणूक वास्तवात झाली, असा दावाही चव्हाण यांनी केला.मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा बोलाची कढी आणि बोलाचाच भात ठरेल अशी आपणास भीती वाटते असा उपरोधीक टोलाही चव्हाण यांनी लगावला. (विशेष प्रतिनिधी)