रमाकांत पाटीलनंदुरबार : कुपोषण कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात योजनांची अंमलबजावणी करूनही राज्यातील कुपोषित बालकांच्या संख्येत तब्बल तीन पटीने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे कुपोषित बालकांना दिला जाणारा आहार नेमका कुणाचे ‘पोषण’ करतोय हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या कुपोषित बालकांच्या धडक शोधमोहिमेत एकूण १८ हजार ९१४ अतितीव्र कुपोषित बालके आढळली असून, ही संख्या तीन पटीने वाढली आहे. यात एक हजार ५७८ बालके दुर्धर आजाराने त्रस्त असल्याचे आढळून आले आहे.
लोकमतचा पाठपुरावाकुपोषित बालकांची धडक आरोग्य सर्वेक्षण मोहीम राबविण्याबाबत ‘लोकमत’ने सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता. सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्याने मोहीम राबविल्यानंतर कुपोषणाची वास्तव आकडेवारी समोर आली होती. हीच मोहीम राज्यभर राबविण्यासंदर्भात ‘लोकमत’नेही पाठपुरावा केला होता. त्याची दखल महिला बालकल्याण विभागाने घेऊन ती मोहीम राबविण्यात आली.
नंदुरबार ३३६८जळगाव २६११औरंगाबाद १३४३धुळे १२६२गडचिरोली १०१७यवतमाळ ९७९अहमदनगर ८३१परभणी ७०५अमरावती ६६४चंद्रपूर ६६३गोंदिया ५३९बीड ५११रत्नागिरी ३३ सिंधुदुर्ग ८६ सांगली ५२कोल्हापूर ३८सोलापूर ८७
मध्यम कुपोषित व अतितीव्र कुपोषित अर्थात सॅम व मॅम बालकांची काळजी घेण्याची आवश्यकता असून, तशी सूचना आरोग्य विभागाला केली आहे. रुबल अग्रवाल, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना