नाशिक : पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे शाही मिरवणूक पाहण्यास मुकलेल्या भाविकांसाठी रविवारी सकाळी पुन्हा हा शाही थाट पाहण्याची संधी आहे. कुंभमेळ्याच्या द्वितीय शाहीस्नानानिमित्त रविवारी सकाळी ही मिरवणूक निघणार आहे. या वेळी तिन्ही आखाड्यांच्या खालशांत वाढ झाल्याने तसेच साधूंचे मोठ्या प्रमाणात आगमन झाल्याने गेल्या मिरवणुकीच्या तुलनेत रविवारी साधूंची संख्या दुपटीने वाढणार असल्याचे आखाड्यांकडून सांगण्यात आले.खालशांच्या संख्येत वाढवैष्णव पंथातील तिन्ही अनी आखाड्यांच्या खालशांची संख्या ६३७ इतकी होती. त्यांत दिगंबर अनीच्या ४०५, निर्वाणी अनीच्या १६२, तर निर्मोही अनीच्या ६० खालशांचा समावेश होता; मात्र प्रथम शाहीस्नानानंतर साधुग्राममध्ये महंताई समारंभांनंतर खालशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आता दिगंबर अनीचे ४५०, निर्वाणीचे १७५, तर निर्मोहीचे खालसे ७२ वर पोहोचले आहेत.आयुक्तांना दंडगेल्या चार वर्षांत नियमानुसार कंत्राटी आणि रोजंदारीवरील कामगारांचा लाखो रुपयांचा भविष्य निर्वाह निधी वारंवार पत्रव्यवहार करुनही पीएफ (भविष्य निर्वाह निधी) कार्यालयात भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या नाशिक महापालिकेची बॅँक खाती गोठविण्याची कार्यवाही सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरची पर्वणी आटोपल्यानंतर करण्यात येणार आहे. तसेच महापालिका आयुक्तांना त्याबद्दल जबाबदार धरत दंडही ठोठावण्यात आल्याची माहिती नाशिक विभागाचे भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली .
शाही मिरवणुकीतील साधूंची संख्या वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2015 2:12 AM