अकोला : दुष्काळासोबतच राज्यात पाणीटंचाईची समस्या उग्र झाली असून, महिनाभरात टँकर्सची संख्या दुपटीने वाढल्याचे शासकीय आकडेवरीवरुन स्पष्ट होते. मराठवाड्यात परिस्थिती भयावह असून, विदर्भातील स्थिती मात्र सध्या नियंत्रणात हे. पावसाळ्य़ात मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊ झाल्याने उन्हाळ्य़ात पाणीटंचाई जाणविणार हे गृहित धरून प्रशासाने सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. डिसेंबरपासूनच राज्यात पाणीटंचाईला सुरुवात झाली. १ डिसेंबरपर्यंत राज्यात ७८ गावे आणि १५९ वाड्यांमध्ये ७३ शासकीय आणि ५१ खासगी, असे एकूण १२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. महिनाभरात त्यात दुपटीने वाढ झाली आहे. सध्या राज्यात एकूण १५९ गावे आणि २१७ वाड्यांमध्ये २३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ११७ शासकीय आणि ११६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक परिस्थिती मराठवाड्यात असून, मराठवाड्यातील ८ जिलंत १२0 गावे आणि ३४ वाड्यांना १७३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात ५ जिलत ८ गावे आणि १९ वाड्यांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात पाच जिलंत २५ गावे आणि १११ वाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाणा आणि यवतमाळ जिलत ४ गावांना ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. कोकण आणि पूर्व विदर्भातील स्थिती मात्र फारशी गंभीर नाही. मात्र पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता येथेही लवकरच टँकरची मागणी होऊ शकते.
राज्यात टँकरची संख्या दुपटीने वाढली!
By admin | Published: January 12, 2015 1:37 AM