Nupur Sharma Prophet remark row: भाजपची माजी प्रवक्ता नुपूर शर्माच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर देशासह विदेशातूनही जोरदार विरोध होताना दिसत आहे. गेल्या शुक्रवारी नमाजानंतर कानपूरमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. त्यानंतर आता आजही नमाजानंतर दिल्लीपासून तेलंगाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालपर्यंत अनेक राज्यात मुस्लिम समाजाकडून तीव्र आंदोल होत आहे.
नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात दिल्लीतील जामा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले. त्यानंतर हळुहळू हे आंदोलन देशातील अनेक राज्यात पसरत गेले. महाराष्ट्रातही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रातील संवेदनशील अशा औरंगाबाद, परभणी, सोलापूर, जालन्यात हजारोंच्यां संख्येने मुस्लिम लोक रस्त्यावर आले.
संबंधित बातमी- दिल्ली ते हैदराबादपर्यंत तीव्र निदर्शने; प्रयागराजमध्ये दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज
यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या शहरांसह तिकडे, नवी मुंबई आणि पनवेलमध्येही शेकडो-हजारो लोक रस्त्यावर आलें. सोलापूरमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेसाठी एमआयएम पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तर, औरंगाबादमध्येही शेकडोंच्या संख्येने जमाव विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. यावेळी खासदार इम्तिजाय जलील यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. तसेच, नुकूर शर्मा आणि जिंदाल यांच्यावर कारवाईची मागणीदेखील केली.
दिल्लीपासून तेलंगाणापर्यंत निदर्शनेनुपूर शर्मा आणि नवीन जिंदालविरोधात दिल्लीसह उत्तर प्रदेशातील प्रयागराज, सहारनपूर, मुरादाबादसह लुधियाना आणि तिकडे पश्चिम बंगालमधील कोलकातामध्येही मुस्लिम समाजाकडून जोरदार विरोध प्रदर्शन झाले. प्रयागराजमध्ये नमाजानंतर पोलिसांवर जोरदार दगडफेक झाली. गेल्या एका तासापासून विविध परिसरात दगडफेक सुरू आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलिसांचा लाठीचार्जप्रयागराजच्या अटालापरिसरात शुक्रवारच्या नमाजानंतर शेकडो लोक जमा झाले आणि घोषणाबाजी सुरू केली. यावळी पोलीस त्यांना समजावण्यास गेली असता, त्यांनी दगडफेक सुरू केली. यात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अजूनही अनेक ठिकाणी वातावरण शांत झाले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.