शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

परिचारिकांच्या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम

By admin | Published: June 16, 2016 3:08 AM

सार्वजनिक आरोग्य विभागातील अन्यायकारक बदल्या, परिचारिकांची शेकडो रिक्त पदे, बदामी रंगाचा गणवेश या संदर्भात आदेश न काढल्याने, राज्यातील सरकारी रुग्णालयांतील २० हजार परिचारिकांनी

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील अन्यायकारक बदल्या, परिचारिकांची शेकडो रिक्त पदे, बदामी रंगाचा गणवेश या संदर्भात आदेश न काढल्याने, राज्यातील सरकारी रुग्णालयांतील २० हजार परिचारिकांनी बुधवारी एकदिवसीय संप पुकारला होता, पण परिचारिकांशी सरकारतर्फे कोणीही चर्चा न केल्याने बेमुदत संप पुकारण्याचा इशारा राज्य सरकारी परिचारिका संघटनेने दिला. मुंबईतील सर जे. जे. रुग्णालय, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, सेंट जॉर्ज, कामा आणि राज्य कामगार विमा योजनेतील सर्वच रुग्णालयांमध्ये बुधवारी परिचारिकांनी कामबंद आंदोलन केले. या रुग्णालयांतील नियमित शस्त्रक्रिया रद्द, तर इर्मजन्सी शस्त्रक्रियांचे प्रमाणही अत्यल्प होते. रिक्त पदे भरावीत, परिचारिकांना रुग्णसेवेशिवाय अन्य कोणतीही कामे लावू नयेत, रजेत सवलत देणे, हक्काचे निवृत्तीवेतन मिळावे, केंद्राप्रमाणे वेतन भत्ते, सरकारी निवासाची सोय असावी, या मागण्यांसाठी परिचारिकांनी संप पुकारला होता. जे.जे.त विद्यार्थी परिचारिका, निवासी डॉक्टर हे वॉर्डमध्ये काम करत होते. काही इर्मजन्सी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. कामा रुग्णालयात बुधवारी फक्त चार सिझेरियन झाली, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)