शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

नूतन कुलगुरू वायुनंदन यांनी पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2017 10:26 PM

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ;कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नूतन कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी बुधवारी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. प्रभारी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी वायुनंदन यांच्याकडे पदाची सूत्रे सोपविली. यावेळी विद्यापीठातील अधिकारी उपस्थित होते. तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून कुलगुरूपद रिक्त होते. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार सोपविण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वीच राजभवनातून वायुनंदन यांच्या नावाची कुलगुरू म्हणून घोषणा करण्यात आली. आज सकाळी वायुनंदन मुक्त विद्यापीठात दाखल झाले. यावेळी त्यांनी विद्यापीठ आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर कुलगुरू दालनात त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. म्हैसेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी म्हैसेकर यांनीही प्रभारी कुलगुरूपदाच्या काळात बरेच काही शिकायला मिळाल्याचे सांगून वायुनंदन यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व विद्याशाखांचे संचालक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.