शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

पोषण आहारात काळाबाजारात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निशाणा

By admin | Published: August 27, 2016 11:24 PM

शालेय पोषण आहारातील काळाबाजार प्रकरणात मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता जि.प. प्रशासनाने या यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ -  शालेय पोषण आहारातील काळाबाजार प्रकरणात मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता जि.प. प्रशासनाने या यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. येत्या शिक्षक दिनी म्हणजेच ५ सप्टेंबरला प्रशासनाने बजावलेल्या नोटीसवर खुलासा देण्याची मुदत संपत आहे. त्यानंतर दोषींवर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे संकेत शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.पोषण आहार प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने चौकशीचा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. या अहवालात मुख्याध्यापकांपासून केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी ते थेट शालेय पोषण आहार अधीक्षक व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. पोषण आहाराच्या यंत्रणेतील अधिकारी असलेले अधीक्षक व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली नसती; तर कदाचित हा काळाबाजार झाला नसता. परंतु त्यांनी हलगर्जीपणा केल्यानेच हा गैरव्यवहार सुरू होता, असा निष्कर्ष जि.प. प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला आहे.