शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

ओ लाही..ओ लाही ! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा : कमाल तापमान चाळीशी पार  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 1:25 PM

राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ४१. १ अंश तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १५. ५अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उष्णतेचे वितरण जमिनीलगत होत असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे़.

ठळक मुद्देरात्रीही उष्णतेच्या झळामध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ सध्या सौराष्ट्र, दक्षिण गुजरातचा किनारपट्टीचा भाग विदर्भात उष्णतेची लाट

पुणे : कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर कमाल तापमानात वाढ झाली आहे़. विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. राज्यात बुधवारी सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ४१़६ अंश तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १५़५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उष्णतेचे वितरण जमिनीलगत होत असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे़. कमाल व किमान तापमानात वाढ झाली आहे़. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशाने वाढ झाली आहे़. किमान तापमानातही वाढ झाल्याचा परिणामी रात्रीही उष्ण वारे वाहताना जाणवत होते़ . मराठवाड्यात किमान तापमानात २ अंशाने वाढ झाली आहे़. सध्या सौराष्ट्र, दक्षिण गुजरातचा किनारपट्टीचा भाग विदर्भात उष्णतेची लाट जाणवत असून पुढील दोन दिवस पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भात उष्णतेची लाट राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे़. २८ व २९ मार्च रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवमान कोरडे राहील़ ३० मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ ३१ मार्च रोजी मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़. २८ व २९ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़.

...................... 

* राज्यातील कमाल व किमान तापमान (कंसात) (अंश सेल्सिअस) : पुणे ३९..७ (१८.६), लोहगाव ४० (२१.२), जळगाव ४१ (१८), कोल्हापूर ३७. ६ (२२.९), महाबळेश्वर ३४.७ (२०.१), मालेगाव ४१.६ (१९.६), नाशिक ३८.५(१७.४), सांगली ३८.५( २१.१), सातारा ३९.२ (२०.५), सोलापूर ४१.२ (२६.१), मुंबई ३१.७ (२४.२), सांताक्रुझ ३३.३ (२३.५), अलिबाग ३२.४ (२२.८), रत्नागिरी ३२.२ (२४.८), पणजी ३३ (२७.३), डहाणु ३३.१ (२३़.६), औरंगाबाद ४१.६(२०), परभणी ४१.६(१९.५), नांदेड ४१ (२३), बीड ४० (२०.६), अकोला ४१.१(२०.५), बुलढाणा ३७.४(२१.६), ब्रम्हपुरी ४०. ७ (२२.८), चंद्रपूर ४१. ४(२६.४), गोंदिया ३५. ४( १८..८), नागपूर ३९. १ (२२. २), वाशिम ४० (२१), वर्धा ४० (२४.५), यवतमाळ ४०. ५ (२३) 

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानGujaratगुजरातVidarbhaविदर्भ