मुंबई: अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात सरकार स्थापन होणार आहे. नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.40 वाजता दादर येथील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तत्पूर्वी विधिमंडळात सर्व आमदारांचा शपथविधी संपन्न होत आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर सर्व आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देत आहेत.
Live Updates:
- आदित्य ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ- प्रणिती शिंदेंनी घेतली आमदारकीची शपथ- विजय वडेट्टीवार यांनी घेतली आमदारकीची शपथ- भास्कर जाधव यांनी घेतली आमदारकीची शपथ- पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आमदारकीची शपथ- चंद्रकांत पाटील यांनी घेतली आमदारकीची शपथ- राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली आमदारकीची शपथ- एकनाथ शिंदेंनी घेतली आमदारकीची शपथ- गणेश नाईक यांनी घेतली आमदारकीची शपथ - अजित पवारांनी घेतली आमदारकीची शपथ- छगन भुजबळांनी घेतली आमदारकीची शपथ- काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी घेतली आमदारकीची शपथ- विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडेंनी आमदारकीची शपथ घेतली- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आमदारकीची शपथ- विधिमंडळ अधिवेशनाच्या एकदिवसीय विशेष सत्राला सुरुवात