शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

जितेंद्र आव्हाड हे कंत्राटी कामगार; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 12:03 PM

आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहित नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली असं पडळकरांनी म्हटलं आहे.

मुंबई – ओबीसींवर माझा विश्वास नाही असं विधान करुन मंत्री जितेंद्र आव्हाडांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. मात्र आता या विधानावरुन विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ओबीसींना आपले फुटसोल्जर म्हणून वापरणारे प्रस्थापितांचे सरकार आता मात्र ओबीसींविषयी जी काही प्रेम दाखवण्याची स्पर्धा भरवतायेत ते निव्वळ हास्यास्पद व फसवं आहे अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.

गोपीचंद पडळकर(BJP Gopichand Padalkar) म्हणाले की, सुप्रीम कोर्टानं ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करेपर्यंत सरकारने केवळ दीड वर्ष नुसत्या तारखा घेतल्या. केंद्राच्या नावाने ओरड केली. आता  मात्र यांची पायाखालची जमीन सरकली आहे. आत्ताही ते काय करतायेत याबद्दल कुठलीच माहिती नाही. राज्य मागासवर्ग आयोग कुठे हरवला आहे? ओबीसी उपसमिती कुठे आहे? इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं  काम सुरू केलंय का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असताना मात्र या सरकारचे मंत्री मोठमोठ्या शिळोप्याच्या गप्पा मारण्यात व्यस्त आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही, कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहित नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला? कदाचित प्रस्थापितांना खुश करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत असा टोला गोपीचंद पडळकरांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला आहे.

दरम्यान, दुसरीकडे अजित पवार(Ajit Pawar) म्हणतात इम्पिरिकल डेटा गोळा होईपर्यंत निवडणूका आम्ही घेणार नाहीत. वेळ पडली तर प्रशासक नेमू म्हणजेच आपल्या मर्जीतील अधिकारी प्रशासक म्हणून नेमायचे आणि स्थानिक संस्थेवरही डल्ला मारायचा, हाच हेतू दिसतोय असा आरोप करत ओबीसींवर तुम्हाला एवढच प्रेम असेल तर भारतीय जनता पक्ष सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त ओबीसी उमेदवार देणार आहे, त्यांना आपण निवडूण द्यावे. अन्यथा तुम्हीही फक्त ओबीसीच उमेदवार देणार आहात, असे तरी जाहीर करावे असं आव्हानही पडळकरांनी महाविकास आघाडीला दिलं आहे.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJitendra Awhadजितेंद्र आव्हाडGopichand Padalkarगोपीचंद पडळकर