माथेरान : आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्ह्यात सुरू केलेल्या नवीन मतदार नोंदणीस सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण यावेळी प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. माथेरानमध्येही पालिकेने ही मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेतली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, मात्र मागील काही दिवसांपासून येथील काही लोकांनी निवडणुकीवर डोळा ठेवून परप्रांतीय व जे माथेरानचे शासनमान्य रहिवासीच नाहीत त्यांचे नाव मतदार यादीत टाकण्याचा घाट घातला असून येथील काँग्रेसचे नगरसेवक शिवाजी शिंदे व मनसे अध्यक्ष संतोष केळगने यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यास विरोध दर्शविला आहे. माथेरान हे संपूर्ण भारतातील वाहनास बंदी असलेले एकमेव पर्यटन स्थळ आहे. वाहने, औद्योगिक, रासायनिक कारखाने नसल्याने येथील हवाही प्रदूषणमुक्त आहे, त्यामुळेच येथे दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे येथील हॉटेल व्यवसायास चांगले दिवस आले आहेत म्हणून येथे हॉटेलमध्ये कामगारांची कमतरता नेहमीच जाणवत असते. येथे अनेक परप्रांतीय रोजगारासाठी येत असतात व हॉटेलमध्ये त्यांना सहज नोकरी मिळते. नोकरी देतानाही कामगारांची फारशी चौकशी होत नाही, त्यामुळे येथे अनेकवेळा गंभीर गुन्ह्यातील हवे असलेले गुन्हेगार सुद्धा आढळून आले आहेत. मात्र आता माथेरानच्या मतदार यादीत अशा परप्रांतीयांची नावे नोंदविली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक शिवाजी शिंदे व मनसे अध्यक्ष संतोष केळगने यांनी के ला आहे.माथेरानच्या डोंगर दऱ्यांमध्ये अनेक आदिवासी वाड्या वसलेल्या आहेत. त्यांना माथेरानमध्येच रोजगार मिळतो पण हे सर्व लोक कर्जत खालापूर पनवेल विधानसभा मतदार संघांशी जोडले गेलेले आहेत. त्यातील काहींना दुर्गम ठिकाणी वास्तव्यास असल्यामुळे फक्त रेशनसाठी माथेरानचे रेशन कार्ड दिले गेले आहे. प्रत्यक्षात शासनाच्या नोंदीत हे सर्व माथेरानचे रहिवासी नाहीत त्यांच्याकडे रहिवासी दाखला नाही तरीही अशा लोकांनाही माथेरानच्या मतदार यादीमध्ये घुसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच माथेरान नगरपालिका निवडणुकीच्या आधी असे प्रकार रोखण्याची गरज आहे. (वार्ताहर)>यादीत मयत व्यक्तींची नावेराज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार माथेरान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदार नोंदणीकरिता व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यासाठी मंगळवारी नगरपरिषद कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन नगराध्यक्षा वंदना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी सागर घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या या मतदार याद्यांमध्ये अनेकांची दुबार नावे, बोगस मतदार आणि वीस वर्षांपूर्वी मयत व्यक्तींची नावे सुद्धा अद्याप नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे वगळण्यात आलेली नसल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.सोयीनुसार नावे वगळली : यादी क्र मांक ८५ मध्ये एकूण मतदार ५५४ आहेत त्यापैकी ५२ मतदार मयत आहेत. यादी क्र मांक ८६ मध्ये एकूण मतदार १११२ आहेत त्यापैकी ४८ मयत आहेत. यादी क्र मांक ८७ मध्ये मतदार १०७५ असून यामध्ये ४७ मयत आहेत. उपस्थितांनी आपल्याच सोयीनुसार नावे वगळली आहेत.
माथेरानमधील बोगस मतदार नोंदणीबाबत आक्षेप
By admin | Published: July 21, 2016 3:07 AM