सचिन लुंगसे - मुंबई
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने वेग घेतला असतानाच मुंबईतील बहुतेक विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढती रंगणार आहेत. मात्र या पंचरंगी लढतींमुळे महायुती आणि आघाडीचे कार्यकर्ते विविध राजकीय पक्षांमध्ये विभागले आहेत. कार्यकत्र्याचीही वानवा आहे. आणि त्यातच ऑक्टोबर हीटने गदारोळ माजविल्याने संपूर्ण महिन्यातील कमाल तापमानाचा पारा 34 ते 36 अंशादरम्यान राहणार असल्याने राजकीय रणधुमाळीत मुंबईकरांचा चांगलाच घाम निघणार आहे.
पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याचा हा कालखंड असल्याने या काळात ऋतुचक्रात बदल होत असतात. त्यामुळे या काळात सातत्याने वाहणा:या वा:याची दिशा बदलत असते. मुळात समुद्राहून मुंबईकडे जे दमट वारे वाहतात, त्या वा:यामुळे शहराचे तापमान नियंत्रण राहण्यास मदत होत असते. परंतु वा:याच्या दिशा सातत्याने बदलत राहत असल्याने सद्य:स्थितीमध्ये आग्नेय दिशेकडून वाहणा:या वा:याचा प्रभाव अधिक आहे. परिणामी तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, मान्सून वा:यामुळे हवेतील बाष्प कमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या कारणास्तव पुढील आणखी काही दिवस मुंबईकरांचा घाम निघणार आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, मुळातच परतीचा पाऊस सप्टेंबर महिन्यातच महाराष्ट्रातून काढता पाय घेतो. मात्र या वेळी परतीच्या पावसाचा प्रवास राजस्थानातूनच विलंबाने सुरू झाला आहे. सद्य:स्थितीमध्ये परतीच्या पावसाने राजस्थानसह गुजरात राज्याचा काही भाग आणि उत्तरेकडील आणखी काही राज्ये काबीज केली आहेत. परतीच्या पावसाचा प्रवास ईशान्यकडील राज्याकडून नंतर महाराष्ट्राच्या दिशेने झाला आहे. आता तो महाराष्ट्रातूनही पुढे सरकेल. परंतु या प्रक्रियेला किमान ऑक्टोबरचा पहिला आठवडा उजाडेल. सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात मान्सूनचा जोर राहणो अपेक्षित होते. परंतु सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारली. त्यामुळे महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसांत उन्हाने डोके वर काढले आणि आता तर कमाल तापमानाचा पारा थेट 37 अंशावर जाऊन ठेपला. मागील चारएक दिवसांपासून शहराचे कमाल तापमान 28 अंशाहून थेट 32 अंशावर पोहोचले आहे. आणि आता तर कमाल तापमानाचा पारा थेट 34 व 37 अंशावर पोहोचला असून, ऑक्टोबर महिन्यात सरासरी तापमान 34 अंशाच्या आसपास राहणार आहे. (प्रतिनिधी)