शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

विषबाधेप्रकरणी ‘बॉक्स ८’वर गुन्हा

By admin | Published: April 16, 2016 2:53 AM

महाविद्यालयात आयोजिलेल्या परिषदेदरम्यान विद्याथ्यांना वितरित केलेल्या खाद्यपदार्थांमुळे १७ विद्याथ्यांना विषबाधा झाल्याने गुरुवारी खळबळ उडाली. या प्रकरणी खाद्य पुरविणारे

मुंबई : महाविद्यालयात आयोजिलेल्या परिषदेदरम्यान विद्याथ्यांना वितरित केलेल्या खाद्यपदार्थांमुळे १७ विद्याथ्यांना विषबाधा झाल्याने गुरुवारी खळबळ उडाली. या प्रकरणी खाद्य पुरविणारे बॉक्स ८ कंपनीचे व्यवस्थापक, कर्मचारी विरुद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईसह पुणे, बंगलोर या शहरांमध्ये बॉक्स ८ या कंपनीच्या ५० हून अधिक शाखा आहेत. वांद्रे येथील थाडोमल शहानी महाविद्यालय, हाजीअली येथील लाला महाविद्यालय, व्हिसलिंग वूड्स, चर्चगेट येथील के.सी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन २०१५-१६’ या परिषदेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी सुमारे १ हजार ४०० विद्यार्थी उपस्थित होते. येथील कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बॉक्स ८च्या ठाणे शाखेतून राजमा आणि भाताचे बॉक्सेस आॅनलाईन मागविण्यात आले होते. या बॉक्सेस मधील खाद्य खाल्याने थाडोमल शहानी आणि लाला महाविद्यालयातील एकूण १७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी सेवन केलेल्या खाद्यपदाथार्चे नमुने चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी अद्याप अटक करण्यात आलेली नाहीह्ण असे जाधव यांनी सांगितले. दोन्ही महाविद्यालयाचा विषबाधे प्रकरणाचा एकत्रित तपास खार पोलीस करणार आहेत. आमच्याकडील तपास त्यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती ताडदेव पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून ’बॉक्स ८’ची झडतीविषबाधा प्रकरणानंतर ठाणे येथील बॉक्स ८ च्या ज्या शाखेतून खाद्य शिजवले गेले त्या विभागाची एफडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास झडती घेतली. अधिकाऱ्यांनी येथील विभागाची पाहणी केली. या पाहणी अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईन अशी माहिती एफडीएचे सहाय्यक आयुक्त, (अन्न ) सुरेश अन्नपुरे यांनी दिली. तर राजमा आणि भाताचे नमुने पोलिसांनी घेतले असून त्याची तपासणी पोलीस करणार आहेत असेही अन्नपुरे यांनी सांगितले.