कजर्त बाल लैंगिक अत्याचार प्रकरण : दाभोळकर, तोंडेच्या पोलीस कोठडीत वाढ
अलिबाग : कर्जतमधील चंद्रभागा चॅरीटेबल ट्रस्टचा विश्वस्त आणि बेकायदा अनाथाश्रमाचा संचालक अजित चंद्रकांत दाभोळकर आणि त्याची साथीदार ललिता भगवान तोंडे यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपुष्टात आल्याने त्यांना येथील जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी त्यांना 9 जून र्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे अत्याचारी दाभोळकर हा मनसेचा पदाधिकारी असल्याचे उघड झाले असून त्याने पुण्यात मनसेच्या तिकिटाखाली नगरसेवक पदाची निवडणूकही लढविली होती.
या प्रकरणी पुण्यातील समाजसेवीका डॉ.अनुराधा सहस्त्रबुद्धे यांनी कजर्त पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर 27 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनाथाश्रमातील संगणकांची हार्डडिस्क पोलिसांनी ताब्यात घेतली असून तपास सुरू आहे.त्याचा अहवाल येणो बाकी आहे. या व्यतिरिक्त कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक उपकरणो देखील जप्त करण्यात आली आहेत. बाल लैगीक अत्याचार संरक्षण कायदय़ांतर्गत दाभोळकरवर गुन्हा दाखल केला आहे. दाभोळकरने तयार केलेल्या अत्याचाराच्या फिल्म्सच्या सीडी अद्याप मिळवणो बाकी आहे.
चंद्रभागा चॅरीटेबल ट्रस्टचा संचालक अजित चंद्रकांत दाभोळकर हा 1995 मध्ये पुण्यातील डहाणूकर कॉलनी प्रभाग क्र.51 चा भाजपा प्रभाग अध्यक्ष होता. त्यानंतर त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. पुणो महानगर पालिकेच्या निवडणूकीत याच डहाणूकर कॉलनी प्रभागातून मनसेचा अधिकृत उमेदवार म्हणून त्याने निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार शाम देशपांडे यांनी दाभोळकरचा पराभव केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक अविनाश पाटील यांनी दिली आहे. दाभोळकर याच्याविरुद्ध मुंबईतील पायधुणी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा देखील दाखल असल्याचे पाटील यांनी सांगीतले. (विशेष प्रतिनिधी)
पीडित मुले हवालदिल
च्पिडीत मुला-मुलींचे जबाब कायद्यानुसार बालहक्क संरक्षण समिती समोर घेण्यात आले आहेत. तरिही पोलीस तपासाच्या निमीत्ताने या मुलांच्या घरी त्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता वारंवार जात असल्याने या मुलांचे कुटूंबिय हवालदिल झाल्याची तक्रार समाजसेविका डॉ.अनुराधा सहस्त्रबुद्धे यांनी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे.
च्ही मुले ज्या परिसरात राहतात तेथे या मुलांकडे पाहण्याचा अन्य लोकांचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. काही मुलांना अन्य मुले चिडवायला लागली आहेत. यांतून पिडीत अल्पवयीन मुला-मुलींच्या मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.