शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

विद्यार्थ्यांच्या योजनांवर अधिकाऱ्यांचा डल्ला

By admin | Published: May 11, 2017 2:42 AM

आदिवासी समाजाचे मागासलेपाण दुर होऊन त्यांनाही मुख्य प्रवाहाता येता यावे, यासाठी राज्य सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांच्या

दीप्ती देशमुख। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आदिवासी समाजाचे मागासलेपाण दुर होऊन त्यांनाही मुख्य प्रवाहाता येता यावे, यासाठी राज्य सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोटयवधी रुपयांची तरतूद केली. शिष्यवृत्ती, फ्रीशिप, संगणक प्रशिक्षण, टाइप राइटर, एमएससीआयटी, स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण आदी कोर्सेस देण्याची तजवीजही केली. परंतु, याच प्रशिक्षणांसाठी केलेल्या आर्थिक तरतुदींवर प्रकल्प अधिकाऱ्यांनी डल्ला मारला. प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि प्रकल्प अधिकारी यांनी हातमिळवणी करत कोट्यवधी रुपये स्वत:च्या खिशात घातले आणि आदिवासी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे एम.जी गायकवाड समितीच्या अहवालतून उघडकीस आले आहे.ठाण्याच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अखत्यारित येत असलेल्या बोरिवली, डहाणू, जव्हार, घोडेगाव, शहापूर आणि पेण या प्रकल्पांची एम. जी. गायकवाड समितीने चौकशी केली. २००४ ते २००९ या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे या चौकशीतून निदर्शनास आले आहे. मात्र सर्वाधिक भ्रष्टाचार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनेतून झाला असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद कमी असताना प्रकल्प अधिकारी आणि संस्थांनी २००४ ते २००९ या काळात या तरतुदीतील २ कोटी १५ लाख ९२ हजार ६१८ रुपये आपल्या खिशात घातले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षण आणिवेगवेगळ्या प्रशिक्षणांपासून वंचित राहिले आहेत. ठाण्याच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सहा प्रकल्पांत २००४ ते २००९ या पाच वर्षांत सर्व विभागातील एकूण १३ कोटी ६७ लाख ८१ हजार ८०२ रुपयांचा घोटाळा झाला आहे. कन्यादान योजना, दुभती जनावरे, मासेमारी व्यवसाय, अपंग व महिलांसाठी दुकाने, बेरोजगारांसाठी प्रशिक्षण, निरनिराळे व्यवसाय, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षणे इत्यादी योजनांमध्ये हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे गायकवाड समितीच्या अहवालाद्वारे उघडकीस आले आहे. (क्रमश:)कोट्यवधींचा घोटाळाबोरिवली १ कोटी ११ लाख ८९ हजार ०५४ रुपये, डहाणू २ कोटी, ८७ लाख ८७ हजार ४४८ रुपये, जव्हार, ३ कोटी ७६ लाख, ०६ हजार २२० रुपये, घोडेगाव ४ कोटी २७ लाख ५९ हजार २०१ रुपये, शहापूर ६१ लाख १३ हजार ०७९ रुपये आणि पेण १ कोटी ०३, २६,८०० रुपयांचा घोटाळा झाला आहे.