महाड : गणोशोत्सवामध्ये संपूर्ण आठवडा गेला, बहुतेक कार्यालयांमध्ये अधिकारी - कर्मचारी गैरहजर होते. अपवाद केवळ पोलीस विभागाचा होता. सात दिवसांच्या गणरायाचे विसर्जन गुरुवारी झाल्यानंतर शुक्रवारी कामकाजाचा दिवस सुरू झालेला असताना महाडच्या उत्पादन शुल्क कार्यालयातील कर्मचारी - अधिकारी मात्र अजूनही गणपतीची सुट्टी उपभोगत असल्याची चर्चा शहरांमध्ये केली जात आहे.
महाड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाअंतर्गत पोलादपूर, महाड, म्हसळे आणि o्रीवर्धन या चार तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांत सरकारमान्य मद्य विक्री दुकानदारांवर नियंत्रण ठेवले जाते. त्याचबरोबर बेकायदेशीर मद्य विक्रीवर कारवाई करणो, उत्पादन शुल्क वसुली इत्यादी महत्त्वाची कामे या कार्यालयामार्फत केली जातात. गेल्या शुक्रवारी गणरायाचे आगमन झाले त्या दिवशी अधिकृत सुट्टी आणि त्यानंतर चौथा शनिवार त्यामुळे सलग दोन दिवसांच्या सुट्टीबरोबर रविवारची हक्काची सुट्टी शासकीय कर्मचा:यांना मिळाल्याने बहुतेक कर्मचारी आपापल्या गावी गणपती सणाला निघून गेले. सोमवारपासून कामकाजाचे दिवस सुरु झालेले असताना बहुतेक कार्यालयातून कर्मचारी - अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले. केवळ अपवाद होता पोलीस विभागाचा.
पोलीस दिवस-रात्र बंदोबस्ताचे काम चोख बजावत असल्याने यावर्षी गणोशोत्सव शांततेत तसेच आनंदामध्ये पार पाडला. परंतु अन्य शासकीय कार्यालयांमध्ये मात्र शांतता दिसून येत होती. गुरुवारी गणपती विसर्जनानंतर शुक्रवारी नेहमीप्रमाणो शहरातील सर्व शासकीय कार्यालये सुरु झाली. परंतु अनेक कर्मचारी हजर नसल्याने नागरिकांची मात्र गैरसोय झाली. राज्य उत्पादन शुल्क कार्यालय चक्क बंदच ठेवण्यात आले. गुरुवारी गणपती विसर्जनानिमित्त उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरुन सर्व मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परंतु आदेशाचे पालन होते किंवा नाही हे पाहाण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी - अधिकारी सण साजरा करीत असल्याने सर्व जबाबदारी पोलीस विभागावर आली व त्यांनी ती चोख बजावली.
शुक्रवारी दुपारी बारा वाजता या कार्यालयात भेट दिली असता कार्यालयाला कुलूप लावण्यात आलेले दिसून आले. चौकशी केली असता गेला आठवडा कार्यालय कधीतरी उघडे दिसले, आज मात्र सकाळपासून बंद असल्याची माहिती मिळाली. सरकारी कर्मचारी सातत्याने गैरहजर राहात असल्याचे ऐकण्यात येते, परंतु चक्क कार्यालय बंद ठेवण्यात आल्याचे ऐकिवात नसल्याने या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)
चौकशीची जिल्हाधिका:यांकडे मागणी
कोणत्याही कारणावरून सरकारी कार्यालयाला सलग सुट्टय़ा आल्यानंतर संपूर्ण आठवडय़ाचे कामकाज पूर्ण ठप्प होते. महसूल, बांधकाम, पंचायत समिती इत्यादी कार्यालयातून बहुतेक कामे ग्रामीण भागातील केली जातात. आपली खोळंबलेली कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेले नागरिक अधिकारी - कर्मचारी कार्यालयांमध्ये गैरहजर असल्याने परत जातात. जिल्हाधिका:यांनी वरील प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.