शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे अधिकार्‍यांची साक्ष!

By admin | Published: July 27, 2014 11:00 PM

लाचखोरीच्या खटल्यांचा लवकर निपटारा करण्याचा प्रयत्न;विधी व न्याय विभागाची सूचना

अकोला: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने केलेल्या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकार्‍याची, त्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू होईपर्यंत इ तरत्र बदली झाल्यास, अशा अधिकार्‍याची साक्ष ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सिंगह्णद्वारे नोंदविण्याची व्यवस्था करण्याची सूचना, विधी व न्याय विभागाने केली आहे.एसीबीच्या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकार्‍यांची बदली झाली, की ते आधी कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील न्यायालयात साक्ष नोंदविण्यासाठी जाणे त्यांच्यासाठी अनेकदा गैरसोयीचे ठरते. त्यामुळे खटल्याचे कामकाज लांबते. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन, एसीबीचे खटले या किरकोळ कारणाने प्रभावित होऊ नयेत, यासाठी विधी व न्याय विभागाने ही सूचना केली आहे.लाचखोर सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांविरुद्ध एसीबीकडून कारवाई केली जाते. एसीबी गुन्ह्यांचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करते; मात्र खटले लवकर निकाली निघत नाहीत. त्यामुळे न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकवेळा साक्षीदारांअभावीही खटल्याची सुनावणी लांबत राहते. लाचखोरीच्या खटल्यांमध्ये कारवाईत सहभागी असलेल्या अधिकार्‍यांचीही साक्ष नोंदविण्यात येते; मात्र कारवाईत सहभागी असलेल्या अधिकार्‍यांची बदली झाली, की नवीन ठिकाणच्या व्यस्ततेमुळे, साक्ष नोंदविण्यासाठी आधी कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील न्यायालयात हजर होणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरते. परिणामी खटल्याचे कामकाज लांबते. या अडचणींचा विचार करून अधिकार्‍यांची साक्ष ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सिंगह्णद्वारे नोंदविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी खटल्याशी संबंधित वकिलांनी साक्षीदार अधिकार्‍यांशी संपर्क साधून, त्यांची साक्ष नोंदविण्याची तारीख आणि वेळ निश्‍चित करावी आणि त्यांची साक्ष ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सिंगह्णद्वारे नोंदविण्याची विनंती एसीबीने न्यायालयास करावी, असा आदेश विधी व न्याय विभागाने दिला आहे. *२४८८ खटले प्रलंबितलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेले एकूण २,४९९ खटले राज्यभरा तील विविध न्यायालयांमध्ये ३0 जून २0१४पर्यंत प्रलंबित होते. मुंबई परिक्षेत्रातील १0२, ठाण्यातील ३५४, पुण्यातील ४३९, नाशिकमधील २९९, अमरावतीमधील २७३, औरंगाबादमधील ३३५ आणि नांदेड परिक्षेत्रातील २२१ खटले प्रलंबित आहेत. *शिक्षेचे प्रमाण अल्पलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या खटल्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प असल्याचे गत दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. २0१३ मध्ये एकूण ३८७ प्रकरणांपैकी ३0७ खटल्यांतील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली, तर केवळ ८0 खटल्यांतील आरोपींना शिक्षा झाली. यावर्षी ३0 जूनपर्यंत १४१ प्रकरणांपैकी १0१ खटल्यांतील आरोपींची निर्दोष मुक्त करण्यात आली असून, ४0 खटल्यातील आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.