पुणे : साखर उद्योगाच्या इतिहासात यंदा प्रथमच देशातील साखर कारखान्यांनी ऑईल कंपन्यांना ५१ कोटी लिटर इथेनॉलच्या पुरवठ्याची हमी दिली आहे. त्यापैकी १२ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा फेब्रुवारी महिना अखेरीस केला असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली. देशातील ५१५ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले होते. त्या पैकी १९३ कारखाने महाराष्ट्रातील आहे. देशात यंदा ३०७ लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. फेब्रुवारी अखेरीस देशातील ४६६ कारखाने सुरु होते. तर, २४७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात १ मार्च अखेरीस ८३७.७२ लाख टन ऊस गाळपातून ९२.५० लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या हंगामात देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाही ३०७ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. सलग दोन वर्षे साखरेची विक्रमी आवक होत असल्याने, अनेक कारखान्यांनी यंदा इथेनॉल निर्मितीवर भर दिला असल्याचे दिसून येत आहे. बी हेवी मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून ५१ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होईल. ऑईल कंपन्यांकडे तशा निविदा भरण्यात आल्या आहेत. निविदा दिल्या प्रमाणे इथेनॉलचा पुरवठा झाल्यास, ५ लाख टनांनी साखर निर्मिती घटेल. फेब्रुवारी अखेरीस देशातील साखर कारखान्यांनी १२ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. त्यामुळे साधारण १ लाख टनांनी साखर निर्मिती कमी झाली आहे. दरम्यान, देशात फेब्रुवारी अखेरीस २४७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील २३ कारखाने कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, १७० कारख्यांचे गाळप सुरु आहे. कर्नाटकात ४१.६९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. येथील ३२ कारखाने बंद झाले असून, ३५ कारखाने सुरु आहेत. उत्तर प्रदेशातील ११७ कारखान्यांनी ७३.६१ लाख टन साखर उत्पादित केली आहे. तमिळनाडूतील ३२ कारखान्यांनी ४.७०, गुजरातमधील १४ कारखान्यांनी ८.८०, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील २५ कारखान्यांनी ५.७० लाख टन साखर उत्पादित केली आहे. बिहार ५.७५, उत्तराखंड २.५५, पंजाब ४.६०, हरयाणा ४.१५, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडने ४.१० लाख टन साखर उत्पादित केली आहे.
साखर उद्योगाच्या इतिहासात यंदा प्रथमच ऑईल कंपन्यांना मिळणार ५१ कोटी लिटर इथेनॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 1:30 PM
देशातील ५१५ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले होते. त्यापैकी १९३ कारखाने महाराष्ट्रातील आहे.
ठळक मुद्देसाखर कारखान्यांची हमी : १२ कोटी लिटरचा केला पुरवठाबी हेवी मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून ५१ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती देशात फेब्रुवारी अखेरीस २४७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखाने बंद होण्यास सुरुवात