लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ब्राझीलमधील आॅलिम्पिक स्पर्धेत नौकानयन (रोर्इंग) क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारा तळेगाव रोही येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलाचा जवान दत्तू बबन भोकनळ याने बारावी परीक्षेत ५२.९२ टक्के गुण मिळविले.दत्तू अत्यंत गरीब कुटुंबातून संघर्ष करीत पुढे आला आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचे उच्चशिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याला बारावीच्या परीक्षेत भूगोल विषयात सर्वाधिक ७१ गुण तर सर्वांत कमी गुण इंग्रजीमध्ये (३५) मिळाले आहेत.
आॅलिम्पिकपटू भोकनळला ५२%
By admin | Published: May 31, 2017 4:05 AM