शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
5
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
6
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
7
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
8
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
9
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

Wine: सरकारी कागदावर वाईन हे अल्कोहोलिक पेयच, दारू म्हणण्यास मद्यप्रेमींचा मात्र विरोध

By यदू जोशी | Published: January 30, 2022 8:57 AM

Wine: वाईन दारू आहे की नाही, यावरून सध्या बराच खल सुरू आहे. किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईनच्या विक्रीला राज्य सरकारने अनुमती दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

- यदु जोशी मुंंबई : वाईन दारू आहे की नाही, यावरून सध्या बराच खल सुरू आहे. किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईनच्या विक्रीला राज्य सरकारने अनुमती दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. वाईनप्रेमी, उत्पादक हे वाईनला दारू म्हणण्याच्या एकदम विरोधात आहेत. राज्य सरकारच्या कायद्यानुसार मात्र  वाईन हे अल्कोहोलिक पेय आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकेकाळी, वाईन ही दारू नाही’ असे विधान केलेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शनिवारी पुण्यात बोलताना वाईन ही दारू नसल्याचे प्रमाणपत्र दिले. राज्यातील अनेक शहरांमध्ये वाईन क्लब आहेत. त्यात अनेक वाईनप्रेमी सदस्य आहेत आणि या क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी वाईनला दारू म्हणण्यास तीव्र विरोध दर्शविला.

सर्वच प्रकारच्या अल्कोहोलिक पेयांना आपल्याकडील सामान्य नागरिक दारू असे म्हणतात. राज्य सरकारच्या बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट १९४९ च्या अंतर्गत अल्कोहोलिक पेय (अल्कोहोलिक बेवरेजेस) म्हणून ज्या पेयांचा उल्लेख केलेला आहे त्यात ब्रीझर, बीअर, वाईन आणि इंडिया मेड फॉरेन लिकर (आयएमएफएल), कंट्री लिकर म्हणजे देशी दारूचा समावेश होतो. यातील आयएमएफएल पेय आणि देशी दारू हे दारू या प्रकारात मोडतात, असे वाईनप्रेमींचे म्हणणे आहे.

वाईनच्या व्यसनाने मृत्यू झाल्याचे उदाहरण दाखवाअति दारू पिल्याने लोक मेल्याची अनेक उदाहरणे आहेत, पण एखादी व्यक्ती वाईनच्या आहारी जाऊन मरण पावल्याचे एक तरी उदाहरण दाखवा, असे आव्हान महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे नाशिक विभाग अध्यक्ष ॲड. रवी निमसे यांनी दिले. द्राक्षाला सरकार किमान आधारभूत किंमत देत नाही; पण सरकारच्या कालच्या निर्णयाने द्राक्ष उत्पादकांना काही तरी आधार मिळाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अल्कोहोलचे प्रमाण किती असते? - ब्रीझरमध्ये पाच टक्क्यांपर्यंत, बीअरमध्ये पाच ते आठ टक्के, वाईनमध्ये ११ ते १४ टक्के इतके अल्कोहोलचे प्रमाण असते. - आयएमएफएलमध्ये ४२.८ टक्क्यांपेक्षा अधिक अल्कोहोल असू नये, असे कायद्यात नमूद आहे.  

किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्याने वाईनची विक्री वाढून त्याचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी येईल. - शैलेंद्र पै, व्यवस्थापकीय संचालक, वॅलोनी विनियार्ड्स प्रा.लि.  

वाईन ही दारू नाहीच. वाईन बनविण्याची प्रक्रिया ही दारूपेक्षा अगदीच वेगळी आहे. वाईनमध्ये अल्कोहोल हे नैसर्गिकरीत्या उपलब्ध असते. आयएमएफएलमध्ये ते मिसळले जाते. सरकारच्या निर्णयाचे निश्चितच स्वागत आहे.- शरद फडणीस, संस्थापक, नागपूर वाईन क्लब. 

दारूबंदी करायची तर सरकार तिच्या विक्रीची वेगवेगळी माध्यमे शोधत आहे. उत्पन्नवाढीचा हा एकच मार्ग सरकारला दिसत आहे. जनतेचे उत्पन्न आणि उत्पादकता कमी करणारी दारू विकण्यासाठी लोकांच्या खिश्यात हात घालायचा आणि त्याचे दु:ख लोकांच्या कुटुंबांवर ढकलून द्यायचे, अशी ही दुष्ट सरकारी नीती आहे. - डॉ. अभय बंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते.  

सरकारने हा निर्णय घेताना जनसुनावणी घ्यायला हवी होती. लोकांना वाईनची अशी विक्री हवी होती का? की भांडवलदार कंपन्यांसाठी हा निर्णय झाला. वाईन दारू आहे की नाही, हा भाग सोडा, पण समाज व्यसनी होण्यासाठीचा तो एक टप्पा आहेच. सरकारला महसुलासाठी दारूच का दिसते? व्यसनमुक्त समाज हे सरकारचे ध्येय असले पाहिजे.- वर्षा विद्या विलास, राज्य सरचिटणीस, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य. 

अतिरिक्त सेवन  करणे धोक्याचेवाईनमध्ये मद्याचे प्रमाण ठराविक प्रमाणात असते, त्यामुळे वाईनचे अतिसेवन धोक्याचे आहे. मात्र वाईन बऱ्याचदा पाचक द्रव्य म्हणून वापरतात, त्यामुळे त्याचे सेवन करण्याचेही प्रमाण ठरलेले असते. आपल्याकडे पाहुणे आल्यावर ज्याप्रमाणे आपण चहासाठी विचारतो त्याप्रमाणेपाश्चात्य संस्कृतीत वाईन हे द्रव्य दिले जाते.- डॉ अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार