एकाच दिवशी, एकाच शहरात! I.N.D.I.A वि. NDA मुंबईत 'भिडणार'; बैठकांची तयारी जोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 04:01 PM2023-08-29T16:01:01+5:302023-08-29T16:01:54+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत.

On the same day, in the same city! I.N.D.I.A Vs. NDA to 'clash' in Mumbai; Preparations for meetings are in full swing | एकाच दिवशी, एकाच शहरात! I.N.D.I.A वि. NDA मुंबईत 'भिडणार'; बैठकांची तयारी जोरात

एकाच दिवशी, एकाच शहरात! I.N.D.I.A वि. NDA मुंबईत 'भिडणार'; बैठकांची तयारी जोरात

googlenewsNext

लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. भाजपाच्या एनडीए युतीविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचे काम सुरु आहे. विरोधकांनी या आघाडीचे नाव इंडिया असे ठेवले आहे. या आघाडीची बैठक मुंबईत होत असताना आता एनडीएने देखील त्याच दिवशी मुंबईत बैठक ठेवली आहे. 

I.N.D.I.A ची बैठक १ सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. तर राज्यातील एनडीएची बैठक १ सप्टेंबरलाच आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट सहभागी होणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मंगळवारी (२९ ऑगस्ट) ही माहिती दिली आहे. 

शेकापचे जयंत पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील १३ छोटे-मोठे पक्ष आणि सामाजिक संघटनांचा समावेश असलेला ‘प्रागतिक विकास मंच’ मुंबईत होत असलेल्या ‘इंडिया आघाडी’मध्ये सामील होणार आहे. याचवेळी एनडीएच्या बैठकीत सहभागी ३८ पक्षांपैकी चार पक्ष विरोधी आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.या बैठकीसाठी येणाऱ्या नेत्यांचं महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत नवा लोगोही जाहीर होणार आहे. 

Web Title: On the same day, in the same city! I.N.D.I.A Vs. NDA to 'clash' in Mumbai; Preparations for meetings are in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.