पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली असून गाझियाबाद येथील मेघना श्रीवास्तव हिने ५०० पैकी ४९९ गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला. पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींचाच दबदबा राहिला आहे. परीक्षेच्या एकुण निकालाची टक्केवारी ८३.०१ एवढी आहे.‘सीबीएसई’मार्फत दि. ५ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत परिक्षा घेण्यात आली होती. शनिवारी दुपारी बारा वाजता आॅनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी देशभरातून ११ लाख ८४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ लाख ६ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकुण ९ लाख १८ हजार ७६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.०१ टक्के परीक्षेचा निकाल लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा निकाल एक टक्क्यांनी अधिक आहे. एकुण विद्यार्थ्यांपैकी ८८.३१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७८.९९ एवढी आहे. मुलींच्या तुलनेत मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९.३२ टक्क्यांनी कमी आहे. एकुण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ७३७ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक तर ७२ हजार ५९९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, मेघना श्रीवास्तव देशात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 4:44 PM
‘सीबीएसई’मार्फत दि. ५ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत परिक्षा घेण्यात आली होती. शनिवारी दुपारी बारा वाजता आॅनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला.
ठळक मुद्देया परीक्षेसाठी देशभरातून ११ लाख ८४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी एकुण ९ लाख १८ हजार ७६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.०१ टक्के परीक्षेचा निकालमंडळाच्या दहा विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.३२ टक्के