तेजस वाघमारे - मुंबई
मुंबई विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागातील एमपीएडच्या विद्याथ्र्यानी प्राध्यापकांच्या मनमानीविरोधात विद्यार्थी तक्रार निवारण समितीकडे दाद मागितल्याने आपली बदनामी झाल्याचा कांगावा करत तीन प्राध्यापकांनी प्रत्येक विद्याथ्र्यावर स्वतंत्र 50 लाखांचा दावा ठोकण्याची नोटीस दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने विद्यार्थी भयभीत झाले आहेत.
याबाबत शारीरिक शिक्षण विभागाच्या प्राध्यापिका जसबीर कौर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणावर काहीही बोलायचे नाही, असे सांगितले. तर इतर प्राध्यापकांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रय} करूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातील एमपीएच्या विद्याथ्र्यानी प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची तक्रार विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण समितीकडे केली होती. विद्यापीठातील विद्याथ्र्यावर अन्याय होत असल्यास विद्यार्थी याबाबत या समितीकडे दाद मागू शकतात. समितीने या प्रकरणाची दखल घेत विद्यार्थी, प्राध्यापक, विभागप्रमुख, ग्रंथपाल आदींचे म्हणणो ऐकून घेतले. या विभागातील प्राध्यापकांमध्ये दोन गट असल्याचे उघड झाले. प्राध्यापकांनी विद्याथ्र्याचे प्रोजेक्ट स्वीकारावेत आणि त्यांचे योग्य मूल्यमापन करावे. तसेच तक्रार केली म्हणून सूडभावनेने वागू नये, अशी शिफारस केली होती. मात्र प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करत विद्याथ्र्याना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे.
विद्यार्थी तक्रार निवारण समितीकडे तक्रार केल्याने आमची बदनामी झाली असून, विद्याथ्र्यानी माफी मागावी अन्यथा, 50 लाखांचा दावा ठोकू, अशी कायदेशीर नोटीस प्राध्यापकांनी विद्याथ्र्याना पाठविली आहे. तीन प्राध्यापकांनी स्वतंत्रपणो विद्याथ्र्याना 50 लाखांची नोटीस पाठविली असून, प्रत्येकाला नोटिसा आल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. विद्याथ्र्यावर 50 लाखांचा मानहानीचा दावा ठोकण्याची नोटीस पाठविणो हे नैतिक अध:पतन असल्याचे प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी सांगितले.
च्विद्यापीठाच्या इतिहासातील ही निंदनीय घटना आहे. विद्यापीठाने विद्याथ्र्याना वा:यावर सोडले असले तरी आम्ही विद्याथ्र्याच्या बाजूने खंबीरपणो उभे राहून त्यांना न्याय मिळवून देऊ. बदनामी झाली म्हणून अशा प्रकारे नोटीस पाठविणो हे नैतिक अध:पतन आहे, असे मत प्रहार संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी व्यक्त केले.