शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

दीड महिन्याचा कारभार लाचखोरीत अडकला

By admin | Published: April 08, 2017 8:12 PM

सेवा खंडित काळातील शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी चार लाखांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता सिदगोंडा बिरगे

ऑनलाइन लोकमत

नांदेड, दि. 8 - सेवा खंडित काळातील शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी चार लाखांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता सिदगोंडा बिरगे यांनी अवघ्या दीड महिन्यापूर्वीच माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी कारभार स्वीकारला, मात्र तो लाचखोरीत अडकला.नांदेड येथे निरंतर शिक्षणाधिकारी पदावर सविता बिरगे यांची २०१२ - १३ मध्ये निवड झाली होती़ त्यापूर्वी बारड येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून बिरगे कार्यरत होत्या़ या काळात त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली़ त्यांना पहिली सेवा नांदेड येथेच देण्यात आली होती़ त्यानंतर जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचा त्यांनी वेळोवेळी प्रभारी पदभार घेतला़दरम्यान, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांची हिंगोली येथे बदली झाल्यानंतर त्यांच्याकडे मागील महिन्यात पदभार सोपविण्यात आला होता़ पुन्हा शिक्षणाधिकाऱ्याचा पदभार काही दिवसांसाठीच असताना लाचखोरीचा ठपका आला. दोन महिला शिक्षकांचे खंडित काळातील १२ लाख ७१ हजार रुपयांचे बील काढण्यासाठी चार लाखांची लाच घेतली. या प्रकारानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सन्नाटा पसरला. बदली, मान्यता, खंडित सेवा काळातील वेतन, अशा विविध कारणांसाठी व्यवहार सर्वत्र होतो, हे उघड सत्य असल्याचे शिक्षक सांगतात. मात्र पुराव्याअभावी कोणीही दोषी ठरत नाही. घेणार व देणार या दोघांच्या सहमतीने व्यवहार होत असल्याने गैरव्यवहाराची शेकडो प्रकरणे कागदावर येत नाहीत, अशी प्रतिक्रियाही जिल्हा परिषदेत ऐकायला मिळाली.(प्रतिनिधी)