मुंबई : दहिसर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी एकाला वडोदरा येथून अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीची ओळख पटली असली, तरी त्याचा साथीदार अद्याप पसार आहे. दीपक कुमार शर्मा (२६) असे अटक आरोपीचे नाव असून, वडोदरामध्ये त्याचे फास्टफूडचे दुकान आहे. शर्मावर चोरी आणि दरोड्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. मात्र गोळीबार करणारा शर्मा नसून त्याचा मित्र अनिल गणगेन उर्फ अँथोनी आहे. तो एक गुंड असून डिसेंबरपासून तो पॅरोलवर बाहेर आहे. बारमध्ये गाणे वाजविण्यावरून या दोघांचे दुसऱ्या एका गटाशी वाद झाले. त्या वेळी घाबरवण्यासाठी त्याने हा गोळीबार केल्याचे समजते. या प्रकरणी पोलीस अँथोनीचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
दहिसर गोळीबारप्रकरणी एकाला अटक
By admin | Published: May 18, 2016 2:24 AM