शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

सुमनगरातील तरुणीच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

By admin | Published: June 14, 2016 3:09 AM

कुर्ल्याजवळील सुमननगरात भरदिवसा तरुणीचा खून करून फरारी झालेल्या संशयित तरुणाला अटक करण्यात नेहरुनगर पोलिसांना अखेर २० दिवसांनी यश आले. सलीम नूरमहोम्मद

मुंबई : कुर्ल्याजवळील सुमननगरात भरदिवसा तरुणीचा खून करून फरारी झालेल्या संशयित तरुणाला अटक करण्यात नेहरुनगर पोलिसांना अखेर २० दिवसांनी यश आले. सलीम नूरमहोम्मद शेख (वय २३) असे त्याचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो हल्यानंतर आठ दिवस पसार झाला होता. त्याने लुटमारीसाठी खून केला की एकतर्फी प्रेमातून याचा अद्याप नेमका उलगडा झालेला नाही. करिश्मा प्रकाश माने (२४) २४ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास ठाणे-मुंबई पूर्व द्रूतगती महामार्गावर कुर्ला स्थानकाजवळून जात असताना अज्ञाताने तिच्या पाठीत सुरा खुपसला होता. उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी घटनास्थळी कसलाही पुरावा न मिळाल्याने संशयिताचा शोध घेणे कठीण बनले होते. परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुणी परिसरातून जात असल्याचे दिसत होते, त्यावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने करिश्मा माने जखमी अवस्थेत पडलेली असताना तिच्याजवळून एका तरुणाला पळत जाताना पाहिल्याची कबुली दिली. त्याने सांगितलेल्या वर्णनानुसार सुमनगरातील रेल्वे लाईन परिसरात रहाणाऱ्या सलीम शेख याला अटक करण्यात आली. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी व लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. सलीमने पोलिसांना सुरवातीला तरुणीचा खून आपल्या सुरेश नावाच्या मित्राने केल्याचे सांगून अडकविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सखोल चौकशीत तो खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले. करिष्माची पर्स व तिचा मोबाईल नाहीसा झाला आहे. सलीम हा सराईत गुन्हेगार असल्याने तो पोलिसांना खरी माहिती देत नाही. मात्र त्याबाबतचे अन्य पुरावे जमविण्यात येत आहे. असे परिमंडळ -६चे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. शेखला १६ जूनला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असूनत्याने एकतर्फी प्रेमातून खून केला की लुटमारीसाठी याचा उलगडा होईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)साक्षीदाराचा रास्ता रोकोत सहभाग करिष्माच्या खूनानंतर आठ दिवस उलटूनही आरोपीला पकडता न आल्याने स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या निषेधार्थ रास्ता रोको केला होता. त्यामध्ये सहभागी असलेल्या एका तरुणाचा चेहरा हा हत्येच्या ठिकाणी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या तरुणाशी मिळता-जुळता असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वाघ यांना आढळले.चौकशी केली असता, भीतीपोटी आपण त्यावेळी तिच्या मदतीसाठी थांबलो नाही, अशी कबुली दिली. त्यावेळी प्रसंगावधान राखून थोडे धाडस दाखविले असते तर कदाचित करिष्मावर उपचार होऊन ती वाचली असती, असे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.