- साहेबराव नरसाळेअहमदनगर : अनेक वर्षांपासून लोकसंख्येच्या आधारे ३०० रुपयांपासून १ हजार ५०० रुपयांपर्यंत मानधन घेणाऱ्या सरपंचांना आता सरसकट ५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. ३१ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या एका क्लिकद्वारे राज्यभरातील सरपंचांच्या खात्यावर मानधन जमा होणार आहे.लोकसंख्येच्या आधारावर दिले जाणारे मानधन किमान ३०० ते दीड हजार रुपयांपर्यंत मिळत असे़ गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामसेवकांकडे सरपंचांचे मानधन वर्ग केले जात असे. हे मानधन कधी तीन महिन्याने तर कधी एक वर्षाने कधीकधी तीन वर्षांपर्यंतही सरपंचांना मानधन मिळत नव्हते. मुख्यमंत्री फडणवीस, ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत परिषदेच्या पदाधिका-यांची बैठक झाली. त्यात सरपंचांना सरसकट ५ हजार रुपये दर महिन्याला मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ३१ जुलै रोजी शिर्डी येथे राज्यस्तरीय सरपंच परिषद होत आहे. त्यात मुख्यमंत्री आॅनलाईन पद्धतीने एकाचवेळी सर्व सरपंचांच्या खात्यावर मानधनाची रक्कम वर्ग करणार आहेत. २६ जुलै रोजी ग्रामविकास विभागाने याबाबत आदेश काढला आहे.
मुंबईत होणार सरपंच भवननवी मुंबईत सिडकोच्या जागेवर सरपंच भवन उभारण्यात येणार आहे़ त्यामुळे मुंबईत सरपंचांना हक्काचे निवासस्थान उपलब्ध होणार आहे.
सरपंचांना यापुढे सरसकट ५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. आॅनलाईन पद्धतीने हे मानधन सरपंचांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. पूर्वी सरपंचांना तुटपुंजे मानधन मिळत होते. - अनिल गिते, जिल्हाध्यक्ष, सरपंच परिषद