शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

पाल्याची प्रगती कळणार एका क्लिकवर

By admin | Published: June 20, 2016 1:15 AM

मूल शाळेत अभ्यासात कुठे आहे, इतर उपक्रमांतील त्याचा सहभाग कसा आहे, याबरोबरच आपले पाल्य ज्या वाहनाने शाळेत जाते, त्या वाहनाचा मार्ग, अशा सर्व गोष्टी एका क्लिकवर पालकांना सहज कळू शकणार आहेत

सायली जोशी-पटवर्धन,   पुणेआपले मूल शाळेत अभ्यासात कुठे आहे, इतर उपक्रमांतील त्याचा सहभाग कसा आहे, याबरोबरच आपले पाल्य ज्या वाहनाने शाळेत जाते, त्या वाहनाचा मार्ग, अशा सर्व गोष्टी एका क्लिकवर पालकांना सहज कळू शकणार आहेत. आई आणि वडील दोघेही नोकरदार असल्याने त्यांना आपल्या पाल्याचे शाळेतील अपडेट्स सहज कळावेत, या उद्देशाने काही तरुणांनी एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. त्यामुळे आपल्या मुलाची शाळेतील प्रगती पाहणे आता आई वडिलांना आणखी सोपे होणार आहे.आशिष चतुर्वेदी या तरुणाने स्कूल डायरी या अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली असून स्मार्टफोनवर किंवा अगदी लॅपटॉपवरही ते सहज वापरता येणार आहे. सध्या भारतातील ३०० हून अधिक शाळांमध्ये त्याचा वापर होत असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये हे अ‍ॅप्लिकेशन वापरले जात आहे. चतुर्वेदी यांनी १० वर्षे एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम केले असून त्यानंतर आयआयएम कलकत्तामधून एमबीएची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:ची कंपनी सुरू केली असून त्यामार्फत त्यांनी हे अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. या अ‍ॅपचा उपयोग पालक आणि शिक्षक यांच्यातील तसेच पालक आणि मुलांमधील नातेसंबंध दृढ होण्यासाठी मोठ्या प्रमाणात होईल असे संबंधित कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळांतील मुलांच्या पालकांना या अ‍ॅप्लिकेशनचा जास्त फायदा असल्याचे चतुर्वेदी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. याबरोबरच मुलांचे सर्व रिपोर्ट मुख्याध्यापक व शिक्षकांकडेही एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने शाळेच्या व्यवस्थापकीय कामासाठीही हे अ‍ॅप्लिकेशन उपयुक्त आहे. यामध्ये मुलांची हजेरी, त्यांच्या शालेय शुल्काबाबतची माहिती, शाळेत साजरे होणारे कार्यक्रम याबाबत सर्व माहिती यावर सहज उपलब्ध होऊ शकते. सध्या अनेक शाळांमध्ये हे अ‍ॅप्लिकेशन मोफत दिले आहे. मात्र अतिशय नाममात्र शुल्कामध्ये काही जास्तीच्या सुविधांबरोबरही ते उपलब्ध असल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले. येत्या काळात यामध्ये आणखी सुधारणा करण्यात येणार असून पालक आणि मुले एकत्रित सोडवू शकतील अशी काही रंजक कोडी, प्रश्नसंचही देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. याबरोबरच आपले मूल जात असलेल्या बसमधील सर्व आपल्या घरी किंवा आॅफिसमध्ये बसून पाहू शकतील, अशी व्यवस्थाही यामध्ये करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासन स्तरावरही हे अ‍ॅप्लिकेशन वापरले जावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅप्लिकेशनचे फायदे१. आपण आपल्या पालकांसाठी महत्त्वाचे आहोत, अशी भावना मुलांच्या मनात निर्माण होते. २. पालक आणि शिक्षक यांच्यात थेट संवाद वाढतो. ३. पालकांमधील दोघेही वर्किंग असल्याने आपले पाल्य शैक्षणिक व इतर स्तरावर नेमकी कशा पद्धतीने प्रगती करीत आहे, याबाबत पालकांना वेळोवेळी अपडेट्स मिळतात.४. पालक मुलांशी जास्त कनेक्ट झाल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. ५. अ‍ॅप्लिकेशनमधून पालकांना सर्व प्रकारची माहिती कळत असल्याने मुलांना आपण कोणाला तरी उत्तर देण्यास बांधील आहोत, याचेही भान राहते. ६. पालक आणि शिक्षक यांचा वेळही वाचतो. ७. बसमधून जाताना पाल्याच्या सुरक्षिततेबाबतही पालकांना माहिती सहज मिळू शकते.