शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
3
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
4
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
5
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
6
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
7
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
8
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
9
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
10
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
11
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
12
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
13
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
15
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
16
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
17
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
18
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
19
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
20
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा

इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

By admin | Published: November 05, 2016 4:43 AM

येथील कॅम्प नंबर ३ परिसरातील सपना गार्डनजवळ असलेल्या सिंधरी अर्पाटमेंट या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला

उल्हासनगर : येथील कॅम्प नंबर ३ परिसरातील सपना गार्डनजवळ असलेल्या सिंधरी अर्पाटमेंट या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला. मनोहर कामरिया (५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेतून मनोहर यांची पत्नी व मुलगा बचावले. हे दोघे किरकोळ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. या घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेने इमारत रिकामी करून सील ठोकले. शनिवारी या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट होईल.१९९२मध्ये बिल्डर हरदास थारवानी यांनी सिंधरी ही इमारत बांधल्याची माहिती पुढे आली आहे. या इमारतीत सगळे व्यापारी राहतात. इमारतीतील सगळे फ्लॅट थ्री आणि फोर बीएचके आहेत. या इमारतीत १२ सदनिका आहेत. या इमारतीचे दुरुस्तीचे काम काही दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले होेते. त्यामुळे काही रहिवासी दुसरीकडे राहण्यासाठी गेले होते. तर काहींनी तेथेच राहणे पसतं केले. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला. स्लॅबचा काही भाग पहिल्या मजल्यावर आला. पहिल्या मजल्यावरील गॅलरीत मनोहर बसले होते. स्लॅबचा कोसळलेला भाग त्यांच्या डोक्यात पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी घरात त्यांची पत्नी कविता आणि मुलगा विनोद होते. हे दोघे किरकोळ जखमी झाले. त्यांना बाहेर काढण्यात आले. यापूर्वीही उल्हासनगरमध्ये धोकादायक इमारती पडण्याच्या घटना घडलेल्या असल्याने सिंधरी इमारत पडल्याची बातमी उल्हासनगरमध्ये वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी कळताच अग्निशमन दल, पोलिस व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित धाव घेतली. या इमारतीपर्यंत पोहचण्यासाठी वाहतूक कोंडीचा अडथळा निर्माण झाला होता. दुरुस्ती सुरु असताना ही घटना घडल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी राहत असलेल्या सगळ््यांना इमारतीबाहेर काढून इमारत रिकामी केली आहे. या इमारतीचे उद्यापासून स्ट्रक्चरल आॅडिट केले जाणार आहे.(प्रतिनिधी)>इमारत धोकादायक नव्हती - पालिकाही इमारत धोकादायक नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दुरुस्तीचे काम कोणत्या कंत्राटदाराला दिले होते. त्याने सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेतली होती की नाही? कामरिया यांच्या मृत्यूस कोण जबाबदार आहे? याचा सगळा उलगडा पोलीस तपासातून होईल.