शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

अकरावी प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ

By admin | Published: July 14, 2017 5:16 AM

अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या गुणवत्ता यादीत नावे जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी शुक्रवारी, १४ जुलैला दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावीच्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या गुणवत्ता यादीत नावे जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी शुक्रवारी, १४ जुलैला दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला. मात्र, अकरावीच्या पुढील वेळापत्रकात कोणताही बदल केला नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली आहे.चव्हाण यांनी सांगितले की, मुंबईतील आॅनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव यादी मध्यरात्री जाहीर झाली. त्यात काही विद्यार्थ्यांना प्रवेशाचे एसएमएस सकाळी उशिरा पोहोचले. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याच्या तक्रारी कार्यालयाकडे आल्या होत्या. या तक्रारींचा विचार करून उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. असे असले, तरी प्रवेशाच्या पुढील वेळापत्रकात कोणताही बदल झाला नसून, पुढील प्रवेश प्रक्रिया ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.याआधी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी उपसंचालक कार्यालयाकडे केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सोबत शुक्रवारी, १४ जुलैला सायंकाळी ५ वाजता अकरावीच्या पहिल्या फेरीचे कटआॅफ व रिक्त जागांचा तपशील प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे.