अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ बाबूलाल शिंदे याच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली़ आरोपीची चौदा दिवसांची कोठडी पूर्ण होत असल्याने त्याला गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़स्थानिक गुन्हे शाखा पथकाने बुधवारी दुपारी आरोपीस मोठ्या बंदोबस्तात न्यायालयात दाखल केले़ लोकांची मोठी गर्दी झाल्याने पोलीस लक्ष ठेवून होते़ सरकारी वकील सतीश पाटील यांनी आरोपीस एक दिवसाची कोठडी मिळावी, असा आग्रह धरला़ गुन्हा घडण्याच्या आधी आरोपी एका गावात जाऊन आला होता़ तेथील घटनास्थळाची पाहणी बाकी आहे़ तसेच हे प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांच्या परिपूर्ण तपासासाठी एक दिवसाची कोठडी मिळावी, असा युक्तिवाद केला़ (प्रतिनिधी)पोलीस-महिला वकिलांमध्ये खडाजंगी काही महिला वकिलांनी कक्षात जाण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला़ सुनावणी सुरू असताना आत जाता येणार नाही, असे मालकर यांनी सांगितले़ यावेळी महिला वकील आणि मालकर यांच्यात शाब्दिक वाद झाला. महिला वकिलांनी न्यायाधीशांकडे तक्रार केली़ न्यायालयाने पोलिसांसह वकिलांनाही समज दिली.
आरोपीच्या कोठडीत एक दिवसाची वाढ
By admin | Published: July 28, 2016 12:25 AM