शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India meets PM Modi: 'जगज्जेती' टीम इंडिया PM मोदींना भेटली, दीड तास रंगल्या गप्पा गोष्टी (Video)
2
हुतात्मा अग्निवीरांना आर्थिक मदत नाही, राहुल गांधींचा दावा लष्कराने फेटाळला, शहीद अग्निवीराचे वडील म्हणाले...  
3
वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार? संजय राऊतांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...
4
Team India ने मोदींची भेट घेतली; पंतप्रधानांच्या एका कृतीने मात्र लक्ष वेधले, वाचा सविस्तर
5
सदावर्ते पती-पत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले, अटक करा; एसटी कामगार संघटनेचे आंदोलन
6
Sanjay Raut : "अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना..."
7
ऐश्वर्या राय-श्रीदेवीनं नाकारलेल्या या सिनेमानं रवीना टंडनला बनवलं स्टार, अक्षय कुमार होता मुख्य भूमिकेत
8
₹१४५ वरून ₹५००० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर; १००००० कोटींपार गेलं मार्केट कॅप
9
खासदार बांसुरी स्वराज यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी, NDMC सदस्य म्हणून नियुक्ती! 
10
सलमानच्या 'सिकंदर'मध्ये 'मुंज्या' मधील हा अभिनेता साकारणार खलनायक, सेटवरील फोटो व्हायरल
11
Weight loss Tips: आरोग्य शास्त्रानुसार वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यायला हवे? वाचा
12
Credit Score : वेळेवर EMI भरुनही क्रेडिट स्कोअर कमी झाला? वाचा नेमकं कारण काय?
13
MCA ची चाहत्यांना खुशखबर! वानखेडेमध्ये मोफत एन्ट्री; 'चॅम्पियन' संघाला पाहण्याची सुवर्णसंधी
14
विश्वविजेते टीम इंडियाचे ४ मुंबईकर खेळाडू थेट अधिवेशनात; विधिमंडळात होणार सत्कार
15
मुंबई देशातील सर्वात महागडे शहर, तर इस्लामाबाद जगात सर्वात स्वस्त; यादीत अव्वल कोण?
16
'रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी', दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मविआचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
17
वसंत मोरे मनसे टू उद्धवसेनेत व्हाया वंचित बहुजन आघाडी?; उद्धव ठाकरेंना भेटणार
18
सायंटिस्ट हादरले! पहिल्यांदाच एका रोबोटची आत्महत्या; कामाच्या प्रेशरला कंटाळला, जिन्यावरून उडी घेतली
19
"मी कोणताही पक्ष बदललेला नाही, जनता हाच...", अजित पवारांकडून जनतेला भावनिक साद!
20
T20 WC FINAL : 'सूर्या'च्या मॅचविनिंग कॅचचा Best Angle; टीकाकारांची बोलती बंद करणारा Video

फडणवीसांचा एक पाय गोव्यात एक महाराष्ट्रात; मेहनतीला मिळाले विजयाचे फळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 10:30 AM

राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री हा मान फडणवीस यांच्या नावावर आहे. त्यावेळी ते प्रदेशाध्यक्ष होते. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गोवा अशा अनेक राज्यात विविध निवडणुकांमध्ये यापूर्वी त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर पहिल्या इतकीच नजर ठेवत गोव्यातील विधानसभा निवडणुकीचे भाजपचे प्रभारी म्हणून विधानसभेचे वि२ोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली. एक पाय महाराष्ट्रात, एक पाय गोव्यात अशी कसरत साधत त्यांनी भाजपला गोव्यात जोरदार विजय मिळवून दिला.

राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री हा मान फडणवीस यांच्या नावावर आहे. त्यावेळी ते प्रदेशाध्यक्ष होते. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गोवा अशा अनेक राज्यात विविध निवडणुकांमध्ये यापूर्वी त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. स्वतंत्र प्रभारी म्हणून पहिली जबाबदारी त्यांच्यावर पहिल्यांदा बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी आली. त्या राज्यात भाजपाच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले. कोरोना झाल्याने त्यांना  काही दिवस आधी मुंबईत भरती व्हावे लागले होते.

गोव्यामध्ये पूर्वी तीन निवडणुकांत त्यांनी प्रचार केलेला होता. त्यामुळे गोव्याच्या राजकारणाचा अंदाज आणि तेथील गावोगावची माहिती त्यांना होती. मनोहर पर्रिकर हयात नसतानाची ही पहिली विधानसभा निवडणूक होती आणि सत्ता पुन्हा मिळविण्याचे आव्हान होते. त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांची बंडखोरी शमावी म्हणून फडणवीस यांनी केलेल्या शिष्टाईला यश आले नाही. सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव, नेत्यांपासून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, प्रचार, प्रचाराचे नियोजन अशा अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. 

विजय खेचून आणला फडणवीस यांनी गोव्याचे प्रभारीपद मिळताच तेथील उमेदवार निश्चिती, सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव, नेत्यांपासून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, इत्यादींवर लक्ष केंद्रित केले. भाजपाविरोधी लाट आहे, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कमकुवत आहे, अशी वातावरण निर्मिती केली जात होती, तेथे कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधून अशक्यप्राय विजय फडणवीस यांनी खेचून आणला त्यामुळे भाजपमध्ये त्यांचे वजन वाढले आहे.

पर्रीकर यांच्या पुत्राचा थोडक्यात पराभवसाऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या राजधानी शहर पणजीतील बाबूश मोन्सेरात विरुद्ध उत्पल यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत बाबूश मोन्सेरात केवळ ७१६ मतांनी विजयी ठरले. पर्रीकरपुत्रांना भाजपने तिकीट नाकारल्यामुळे तो देशभर चर्चेचा विषय ठरला होता.

टॅग्स :Goa Assembly Election Results 2022गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस