शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

एक इंच महाराष्ट्र वेगळा होऊ देणार नाही

By admin | Published: February 12, 2017 2:23 AM

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रश्नच येत नाही. कोणी स्वप्नात जरी मुंबई तोडण्याचा विचार केला तर तिथे जाऊन त्याची नरडी दाबू. मुंबई, विदर्भच काय महाराष्ट्राचा

मुंबई : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रश्नच येत नाही. कोणी स्वप्नात जरी मुंबई तोडण्याचा विचार केला तर तिथे जाऊन त्याची नरडी दाबू. मुंबई, विदर्भच काय महाराष्ट्राचा एक इंचही वेगळा होऊ देणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. शनिवारी वडाळा येथील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा टीकेचे लक्ष्य बनविले. शिवसेनेने सर्वाधिक गुंडांना उमेदवारी दिल्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपाचा त्यांनी या वेळी समाचार घेतला. देवस्थानच्या जमिनी हडपणाऱ्या गुंडांनाही भाजपाने पक्षात घेतले. सगळे गुंड सध्या भाजपात दाखल झाले आहेत. गुंडांचा वापर करत निवडणुका जिंकण्याचा डाव मुख्यमंत्री आखत असतील तर निवडणुका बाजूला ठेवून आधी गुंडांचा बंदोबस्त करू. शिवसेनेत गुंड नाहीत, सैनिक आहेत. मुंबईसाठी धावून जाणारे शिवसैनिक आहेत. ९२ साली शिवसैनिकच धावला, अंगावर वार झेलले म्हणून मुंबई वाचली. श्रीकृष्ण आयोगाने अहवालात शिवैनिकांची नावे घेतली. ज्यांनी मुंबई वाचवली ते गुंड नव्हते. तेंव्हा हे भाजपावाले कुठे होते, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.मुद्दे नसले की लोक खोटेनाटे आरोप करतात. मुंबईत जितकी कामे शिवसेनेने केली तितकी कोणत्याच पक्षाने केली नाहीत. चिखलात कमळ फुलते म्हणतात, मग आमच्यावर कमळ फेका चिखल का फेकता, असा सवाल करतानाच यांच्याकडे कमळ नाही फक्त मळ आणि मळमळ आहे. आमच्याकडे विकासाची तळमळ आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. पोलीस खाते तुमच्याकडे आहे तरी मुंबईचे पाटणा झाल्याचा आरोप कसा काय करता? आता भाजपा खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, रस्त्याच्या कामाला अधिकारी आणि आयुक्त जबाबदार आहेत. त्या कामांशी नगरसेवकांचा संबंध नाही. अधिकारी, आयुक्त नेमण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे आहे, असे उद्धव म्हणाले.सामान्य मुंबईकर दरवर्षी २ लाख कोटींचा कर दिल्लीला देतो. पंतप्रधान म्हणून कारभार करायचा सोडून तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, अशा धमक्या मोदी देत आहेत. जन्माला येतो त्याची कुंडली बनतेच, मोदींचीसुद्धा कुंडली आहेच. त्या वेळी बाळासाहेब नसते तर काय केले असते, असा सवालही उद्धव यांनी केला. (प्रतिनिधी)...हा तर शिवरायांचा अपमानलोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळीही शिवरायांचा आशीर्वाद होता. मग शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी तुम्ही दोन वर्षांत काय केले याचे उत्तर द्या, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. खोटे बोलणारे मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभणे हा शिवरायांचा अपमान आहे, असे उद्धव या वेळी म्हणाले.