शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

आयटीआय प्रवेशाचा एक लाखाचा टप्पा पार; समुपदेशन फेरी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 10:28 AM

३० ऑक्टोबरपर्यंत प्रवेशनिश्चितीचे आवाहन

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात आयटीआय प्रवेशाचा १ लाख प्रवेशाचा टप्पा पूर्ण झाला असून ३० ऑक्टोबरपर्यंत आयटीआय प्रवेशाची समुपदेशन फेरी सुरू राहणार आहे, तर आतापर्यंत आयटीआयचे जवळपास एकूण ७० टक्के प्रवेश झाले असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी समुपदेशन फेरीतून आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन संचालक दिंगबर दळवी यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशाला झालेल्या विलंबाने आयटीआय प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांची पसंती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आयटीआयच्या पहिल्या फेरीमध्ये ३१,५२९, दुसऱ्या फेरीत १५,५९८, तिसऱ्या फेरीत १५,२६१ आणि चौथ्या फेरीत ९९५८ असे चार फेऱ्यांमध्ये तब्बल ७२ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. मागील वर्षी या चार फेऱ्यांमध्ये ६२ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यामुळे समुपदेशन फेरीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येत वाढ होणार आहे. आतापर्यंत समुपदेशन फेरीमध्ये २५ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामध्ये शासकीय संस्थांमध्ये १९,७५५, तर खासगी संस्थांमध्ये ५८८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र, गतवर्षी समुपदेशन फेरीमध्ये ३२,६७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्या तुलनेत यंदा समुपदेश फेरीला विद्यार्थ्यांचा फारच कमी प्रतिसाद मिळाला असला तरी त्यात वाढ अपेक्षित आहे. प्रवेशाची स्थिती फेरी                     प्रवेश                      २०२१    २०२०पहिली         ३१५२९    २५५८२दुसरी           १५५९८    १३१०२तिसरी          १५२६१    १२७७७चौथी            ९९५८     ११३२३समुपदेश    २५६३८    ३२६७६(प्रवेश सुरू)