यदु जोशी, मुंबईराज्यात एक कोटी सदस्य नोंदणी केल्यानंतर प्रदेश भाजपा ६ आॅगस्टपासून दोन महिन्यांच्या काळात तब्बल एक लाख कार्यकर्ते, नेत्यांना प्रशिक्षणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेणार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण अभियान असे त्याचे नाव असेल. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कल्पनेतून साकारलेली ही योजना असून गेली २० वर्षे भाजपात पूर्णवेळ कार्य करणारे श्रीकांत भारतीय यांची या अभियानाच्या राज्य प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणाची सुरुवात म्हणून ६ आणि ७ आॅगस्टला मुंबईत होईल. त्यात आधी २७५ प्रशिक्षकांचे प्रशिक्षण होईल. हे प्रशिक्षक विभागीय पातळीवर प्रशिक्षकांना प्रशिक्षित करतील. नंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन दिवसांचे प्रशिक्षण वर्ग होतील.मंडळ, जिल्हा आणि राज्यस्तरीय प्रशिक्षण असे तीन टप्पे असतील. श्रीकांत भारतीय यांना प्रशिक्षण अभियानात सहकार्य करण्यासाठी माधवी नाईक, सुनील राणे आणि प्रवीण घुगे हे तीन सहप्रमुख नेमण्यात आले आहेत. पक्षाच्या सर्व सक्रिय सदस्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
एक लाख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण
By admin | Published: July 12, 2015 2:50 AM