कासा : डहाणू तालुक्यातील रायतळी येथील आदिवासी शेतकऱ्याला एका महिन्याचे घरगुती वीजवापराचे बील ४६,८६९ रुपये आले आहे. आलेले आव्वाच्या सव्वा बील भरण्यास गरीब शेतकरी असमर्थ ठरल्याने त्याचे मीटर काढण्यात आले आहे. दरम्यान, त्याने महावितरणला दिलेली कैफियत वजा गाऱ्हाणे न एकताच आधी बील भरा मग काय ते बघू अशी भूमिका कंपनीने घेतली आहे.ककडया जिव्या दांडेकर या शेतीवर उपजिवीका करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्याकडून साधारण दोनशे ते अडिचशे रुपये आकारणी होते. २९ ते ३० युनिट एवढा त्याचा दरमहा वापर आहे. असा रेकॉड महावितरण दफ्तरी नोंद आहे. मात्र, आॅक्टोबर महिन्यात त्यास अचानक ४६ हजार ८६९ रुपये येवढ्या वीज देयकाची आकारणी करण्यात आली. असल्याने तो विवंचनेत पडला आहे. एवढी मोठी रक्कम उभ्या आयुष्यात एकत्र न पाहिलेल्या या शेतकऱ्याने हे बील कसे फेडावे असा प्रश्न उभा आहे.बऱ्याचदा महावितरणचे कर्मचारी कार्यालयत बसूनच रिडिंग नोंदणी करुन बील पाठवत असतात. अशी प्रकरणे अनेक वेळा उघड झाली असल्याचे वीज ग्राहकांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. मात्र, असा निश्काळजी व कामचुकारपणा उघड करुनही त्या बाबत तक्रार केल्यावर कायद्यावर बोट ठेऊन आधी वीज देयकाची पुर्तता करा. मग बघू अशी भाषा असते. हा प्रश्न खरं तर ग्राहक न्यायालयात मांडला गेल्यास न्याय मिळेल असा विचार पिडित शेतकरी करीत असल्याचे वृत्त आहे. महावितरणचा कारभार यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यात ग्राहकांमधुन संताप व्यक्त होतो आहे. (वार्ताहर)>शाळेलगत असलेला ट्रान्सफॉर्मर कोसळण्याच्या स्थितीत बोईसर : येथील दीजय नगर मधील सी. बी. संखे इंग्लिश मीडियम शाळेलगत असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या स्ट्रक्चरचे सर्व खांब गंजून जीर्ण झाल्याने ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चरसह कोसळण्याच्या स्थितीत असल्याने मोठी दुर्घटणा होण्याची शक्यता आहे. ट्रान्सफॉर्मर कोसळल्यास दिजय नगर अंधारात बुडणार आहे. या संदर्भात स्थानिकांनी दिलेल्या पत्राला महावितरणने केराची टोपली दाखिवली आहेदीजय नगर या माठ्या रहिवासी संकुलाला २०० केव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर मधून विजचा पुरवठा होत असून त्या ट्रान्सफॉर्मरचे स्ट्रक्चर आणि त्या लगत असलेले चॅनलचे लोखंडी खांब पूर्णपणे गंजल्याने त्या खंबांची चाळण झाली आहे. ट्रांन्सफार्मरलगतच शाळा असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांना त्यापासून धोका आहे. या संदर्भात ८ ते १० महिन्या पूर्वी येथील रहिवाशांनी महावितरणला पत्राद्वारे निवेदन दिले आहे.
एका महिन्याचे वीज बिल ४६ हजार
By admin | Published: April 05, 2017 3:31 AM