शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कॉल ड्रॉप झाल्यास एक रुपयाची भरपाई

By admin | Published: October 17, 2015 3:02 AM

मोबाईलवरील कॉल ड्रॉपच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता कॉल ड्रॉपसाठी ग्राहकाला प्रति कॉल एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दिले

मुंबई : मोबाईलवरील कॉल ड्रॉपच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता कॉल ड्रॉपसाठी ग्राहकाला प्रति कॉल एक रुपयाची भरपाई देण्याचे आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दिले. या आदेशाची अंमलबजावणी येत्या १ जानेवारी २०१६ पासून होणार आहे. कॉल ड्रॉपकरिता भरपाई देण्याची एका दिवसातील कमाल मर्यादा ही तीन कॉल्सची असेल. कॉल ड्रॉपच्या तक्रारींत सातत्याने वाढ झाल्यानंतर आॅगस्ट महिन्यांत स्वत: पंतप्रधान मोदी यांनी लक्ष घालत, तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर सरकारने वेळोवेळी सेवा सुधार करण्यासंदर्भात कंपन्यांना निर्देश दिले होते, तरीही या समस्येचे निराकरण झालेले नाही. या पार्श्वभूमीवर आता या कंपन्यांना भरपाई देण्याची नवी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. ट्रायच्या आदेशानुसार, एका दिवसात जरी कितीही कॉल ड्रॉप झाले असले, तरी ग्राहकाला तीन कॉलची भरपाई मिळेल. याचाच अर्थ, तीन रुपये मिळतील व हे तीन रुपये त्याच्या बिलाच्या रकमेत सामावून घेत बिल दिले जाईल. बिलामध्ये कॉल ड्रॉपच्या भरपाईचा उल्लेखही होईल. कंपन्यांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)