शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

शाळेत न येणाऱ्या मुलाच्या पालकाला एक रुपया दंड

By admin | Published: June 26, 2017 1:10 AM

राजर्षींचा सक्तीच्या शिक्षणाचा जाहीरनामा : कोल्हापूर संस्थानातील १०० वर्षांपूर्वीच्या शिक्षणविषयक जागरुकतेचा नमुना

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्कआज एखादा विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिला तर ‘मोबाईल’वरून त्याच्या घरी ‘मेसेज’ दिला जातो. पालकांना शाळेत बोलावून त्यांचेही उद्बोधन केले जाते. मात्र १०० वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी शाळेत जी मुले येत नाहीत, त्यांच्या पालकांना एक रुपया दंड करण्याचा आदेश काढला होता. आपल्या संस्थानातील प्रजेच्या मुलांनी सक्तीने शिक्षण घ्यावे, यासाठी शाहू महाराजांनी हा कठोरपणा स्वीकारला होता. आज एकीकडे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी शाहू महाराजांना १०० वर्षांपूर्वी ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध’ असल्याची जाणीव झाली होती. म्हणूनच त्यांनी आपल्या संस्थानातील जनतेच्या कल्याणासाठी यासारखे कायदे तयार केले. सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याचा जाहीरनामा २९ सप्टेंबर १९१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. ‘करवीर इलाख्यातील आमच्या सर्व प्रजाजनांना लिहिता-वाचता येऊन आपली स्थिती ओळखून सुधारण्यास त्यांनी समर्थ व्हावे म्हणून खाली दिल्याप्रमाणे नियम करण्यात येत आहे,’असा उद्देश या कायद्यामध्ये प्रारंभीच नमूद करण्यात आला आहे. यानंतर शाळा म्हणजे काय, विद्यार्थी व्याख्या अशा कायदेशीर बाबींचा समावेश आहे. पाच भागांमध्ये हा कायदा विभागला असून, यातील चौथ्या भागामध्ये शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.१ शिक्षणास योग्य वयाच्या मुलांची यादीची प्रसिद्धी झाल्यापासून ३० दिवसांचे आत मुलांच्या आईबापांनी आपली मुले शाळेत पाठविली पाहिजेत. अथवा जर अपिल केले असेल तर आणि अपिलात माफी मिळाली नसेल, तर अपिलाच्या निकालाची समज मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत मुले शाळेस पाठविली पाहिजेत.२ नियम ११ मध्ये सांगितल्याप्रमाणे मुलांच्या नावांची यादी आल्यावर त्यांचे पालकांस मामलेदाराने समन्स काढावे आणि त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व ते संयुक्तिक न दिसल्यास प्रत्येक मुलाबद्दल एक रुपयापर्यंत दंड करावा. हा दंड प्रत्येक महिन्यास मुले शाळेत जाईपर्यंत करावा. ३ ३० दिवसांचे आत दंड न भरल्यास लॅँड रेव्हेन्यूचे नियमाप्रमाणे जंगम जिंदगी जप्त करून दंडाचा वसूल करावा.४ शाळेत मुलांस घातल्यावर मुले शाळेत वेळच्या वेळी जातात की नाही हे पाहणे हे आईबापांचे कर्तव्य समजले जाईल. ५ एका महिन्यात मुले १५ दिवस गैरहजर राहिली तर तशा विद्यार्थ्यांची व पालकांची यादी पाटलांकडे द्यावी. चौकशीनंतर यात आईबापाचा दोष दिसल्यास पहिल्याप्रसंगी ४२ आणेपर्यंत दंड करावा व पुढील प्रत्येक प्रसंगी १ रुपयापर्यंत दंड करावा.६ एवढे करूनही आईबाप आपली मुले शाळेस पाठवीत नाहीत व त्यांना मजुरी करण्याकरिता पाठवितात, अगर शेतात पाठवितात असे दिसून आल्यास शिक्षा करणारे अधिकाऱ्यांनी १ रुपयापासून पाच रुपयांपर्यंत आईबापास दंड करावा.