शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

खरिपाच्या एकतृतीयांश पीकक्षेत्राचा उतरविला विमा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 10:40 AM

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधे अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारने विम्याची मुदत २४ जुलैवरून ३१ जुलैपर्यंत वाढविली होती.

ठळक मुद्दे१ कोटीहून अधिक अर्ज : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा ७२ टक्के वाटामराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा घेणे केले पसंत

पुणे : पीक विमा रकमेच्या परताव्यावरून उडालेले राजकीय रणकंदन, मराठवाडा व विदर्भातील पावसाचा घसरलेला टक्का, निसर्गाचे बदलत असलेले चक्र या पार्श्वभूमीवर यंदा पीक विम्यासाठी तब्बल १ कोटी ७ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यातील तब्बल ७२ टक्के अर्ज मराठवाड्यातील आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी खरिपाच्या एकतृतीयांश क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण घेतले आहे. मराठवाडा गेली काही वर्षे सातत्याने दुष्काळाला सामोरा जात आहे. पावसाळ््याचे दोन महिने संपले तरी मराठवाड्यात क्षमतेच्या अवघा तीन टक्के पाणीसाठा धरणात आहे. नागपूर विभागातही केवळ २४ व अमरावती विभागात ३४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे साहजिकच मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधे अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी राज्य सरकारने विम्याची मुदत २४ जुलैवरून ३१ जुलैपर्यंत वाढविली होती. पीक विमा योजनेसाठी विमा कंपन्यांना द्याव्या लागणाऱ्यां शुल्कातील काही वाटा शेतकरी, तर उर्वरित भाग केंद्र व राज्य सरकार उचलते. जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा घेणे पसंत केले आहे. खरिपाचे सरासरी क्षेत्र दीड कोटी हेक्टर आहे. त्यापैकी तब्बल ५३ लाख ७८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरविला आहे. गत खरीप हंगामात (२०१८) राज्यातील ८५ लाख ६ हजार ८२८ शेतकऱ्यांनी ४९ लाख २० हजार ३९१ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता. यंदा शेतकऱ्यांची संख्या १ कोटी सात लाख ६२ हजार ३२५ झाली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या तब्बल ७८ लाख ४८ हजार २८८ इतकी आहे. खालोखाल पुणे विभागातील ११ लाख २७ हजार ४३५ व अमरावती विभागातील १० लाख ५४ हजार ८०९ शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले आहेत. .१८ हजार कोटींचे विमा संरक्षण मिळणार

शेतकऱ्यांनी ५३ लाख ७८ हजार ६८१ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला असून, त्यापोटी शेतकऱ्यांनी ४५० कोटी ५ लाख ६३ हजार ४३३ रुपये भरले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने विमा हप्त्यापोटी प्रत्येकी १५९९ कोटी रुपये अनुदान म्हणून दिले आहे. यातून तब्बल १८ हजार १०३ कोटी २६ लाख ७९ हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. ..........विभागनिहाय सहभागी शेतकरी     (पीक क्षेत्र हेक्टरमध्ये/रक्कम रुपयांत)विभाग    सहभागी        शेतकऱ्यांनी                क्षेत्र           शेतकरी        भरलेली रक्कम    कोकण    ३५,८०९      १,७३,३२,२०५          २१५१४.०१नाशिक    ३,२२,५३९      २९,५३,३४,७९२    २५०१४४.८३पुणे            ११,२७,४३५      ४१,६७,९१,१००    ७५१३४१.८४कोल्हापूर    ९९,८५३      २,७९,६६,३१७    ५६०२१.०६औरंगाबाद    ४१,८२,७५७       १४३,०३,१८,६६१    १५५८४२१.१३लातूर    ३६,६५,५३१      १४३,७८,०७,२७३    १८०५२५७.४१अमरावती    १०,५४,८०९    ६६,२६,०६,८२१    ७६२८२५.१९नागपूर    २,७३,५९२    १६,२४,०६,२६१    १७३१५५.९३एकूण    १,०७,६२,३२५    ४४५,०५,६३,४३३    ५३,७८,६८१.४०........ 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारagricultureशेतीRainपाऊसdroughtदुष्काळ