मुंबई : देशासह महाराष्ट्र आणि मुंबईला झोड झोड झोडपणारा मान्सून आज अखेर म्हणजे बुधवारी देशातूनही हद्दपार झाला आहे. तत्पूर्वी १४ आॅक्टोबर रोजी मान्सूनने मुंबईतून आपला परतीचा प्रवास सुरू केला होता. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत म्हणजे बुधवारी मान्सून संपूर्ण भारतातून माघारी परतला आहे, अशी घोषणा हवामान खात्याने केली आहे.
नैर्ऋत्य मोसमी पाऊस बुधवारी संपूर्ण भारतातून माघारी परतला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मान्सून परतला असतानाच कोकण, गोव्याच्या अनेक भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.
असा झाला प्रवासच्केरळात ८ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने १९ जुलै रोजी देश व्यापला.च्१ जूनपासून २८ आॅगस्टपर्यंत भारतभर तब्बल १०१ टक्के पाऊस नोंदविण्यात आला.च्मध्य आणि दक्षिण भारतात अनुक्रमे ११३, १०६ टक्के पाऊस नोंदविण्यात आला.च्२१ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात १ हजार २५७ मिलीमीटर पावसाची नोंद.च्१ जून ते २९ सप्टेंबर या कालावधीत देशभरात ९५६.१ मिलीमीटर पावसाची नोंद.च्देशभरात सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत १० टक्के अधिक मान्सूनची नोंद.च्देशभरातील २५ टक्के भाग अद्यापही दुष्काळाच्या झळा सोसत आहे.च्गेल्या १९ वर्षांत अठराव्यांदा पूर्वोत्तर राज्यांत कमी मान्सूनची नोंद.च्सांताक्रुझ वेधशाळेत तब्बल पाच वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
राज्यात सध्या कोरडे हवामानच्नैर्ऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे.च्१८ आॅक्टोबरपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज आहे.च्मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांतील काही भागात ढगाळी वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे.नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागात १९ ते २० दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे.च्हवामानाची ही परिस्थिती आगामी आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यतादेखील नाकारता येणार नाही, असे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले.