पनवेल : भाजपा सरकार संविधान बदलणार, अशा खोट्या आरोळ्या विरोधक देत असतात. मग मी कशाला तिथे आहे? डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच देश आहे. जो देशाला तोडेल, त्याला मी फोडेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी दिली असून, वाटेल ते झाले, तरी मी समाजाला न्याय देणार, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी के ले.खारघर येथे रविवारी प्रीती ठोकळे यांनी आयोजित महापुरु षांच्या संयुक्त जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्र माला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर हेही उपस्थित होते. रामदास आठवले यांनी आपल्या काव्यमय विनोदी शैलीत, तर कधी गंभीर होत उपस्थितांची मने जिंकली. भाजपा सरकारच्या नोटाबंदीचे जोरदार समर्थन आठवले यांनी केले. जेव्हा क्र ांती होते, तेव्हा त्रास होतोच, असे सांगितले. याचा अर्थ, एटीएमच्या लाइनमध्ये उभ्या असलेल्या जनतेला त्रास व्हावा, असे नाही, तर सर्वांना सांगून हा निर्णय घेतला असता, तर काय झाले असते ते सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे केंद्र सरकारने तडकाफडकी निर्णय घेतला ते योग्यच केले, असे ते म्हणाले. ‘भीम’ अॅपची नवी संकल्पना केंद्र सरकारने सुरू केली असून, तिचाही लाभ घ्या, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके उभी करायला घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘महासत्ता भारत’ बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समर्थ महाराष्ट्र घडवायचा आहे, असे आ. प्रशांत ठाकू र यांनी सांगितले. या कार्यक्र माला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपा ज्येष्ठ नेते अभिमन्यू पाटील, शंकर ठाकूर, अनंता तोडेकर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष लीना गरड, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)देशाविरोधात लढणाऱ्यांच्या मी नेहमीच विरोधात उभा राहिलो आहे. सध्या सुरू करण्यात आलेले ‘भीम’ अॅप ही केंद्र सरकारची नवी संकल्पना अतिशय चांगली आहे. उपयुक्त आहे. त्यामुळे तिचा वापर सर्वांनी करायलाच हवा, असे आवाहनही आठवले यांनी या वेळी केले.
जो देशाला तोडेल, त्याला मी फोडेन!
By admin | Published: May 02, 2017 4:55 AM