शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
3
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
4
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
5
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
6
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
7
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
8
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
9
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
10
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
11
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
12
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
13
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
14
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
15
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
16
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
17
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
18
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
19
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
20
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

ओएनजीसीवर प्रकल्पग्रस्तांची धडक

By admin | Published: July 12, 2017 2:42 AM

प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी (१० जुलै) प्रकल्पाच्या मुख्यालयालाच धडक देऊन आपला संताप व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : येथील ओएनजीसी प्रकल्पात चौथ्या श्रेणीतील हाउसकिपिंगच्या कामातही स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यास प्रशासनाने नकार दिल्याने, संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी (१० जुलै) प्रकल्पाच्या मुख्यालयालाच धडक देऊन आपला संताप व्यक्त केला. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे नमते घेतलेल्या ओएनजीसी प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात बुधवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.नागाव, म्हातवली आणि चाणजे ग्रामपंचायतीच्या वतीने उरण ओएनजीसीच्या मुख्यालयासमोरील अप्पू गेटवर प्रकल्पग्रस्तांनी जोरदार निदर्शने केली. सुमारे ९०० एकर भातशेतीवर उभारण्यात आलेल्या ओएनजीसीच्या एलपीजी प्रकल्पात हाउसकिपिंगच्या कामाची निविदा काढण्यात आली होती. या कामात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याची मागणी नागाव, म्हातवली आणि चाणजे ग्रामपंचायतींनी केली होती. स्थानिक आमदार मनोहर भोईर, भाजपा नेते महेश बालदी यांनीही याबाबत ग्रामपंचायतींच्या वतीने पाठपुरावा केला होता. प्रकल्पात साखरखार मजूर सोसायटीला मिळालेल्या कामात स्थानिक ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या नावाच्या यादीतून कामगार भरती करण्याचे आश्वासन ओएनजीसीचे ग्रुप जनरल मॅनेजर हसन यांनी दिले होते. प्रत्यक्षात काम सुरू करताना ठेकेदाराने ओएनजीसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासून स्थानिकांना डावलून कामगारांची भरती केली. यामुळे तिन्ही ग्रामपंचायती मधील स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.ओएनजीसी प्रशासनाकडे विचारणा करण्यास गेलेल्या ग्रामपंचायतींना दिलेल्या आश्वासनाबाबत अधिकाऱ्यांनी हात वर केले. यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी प्रकल्पाच्या मुख्यालयात धडक देऊन आपला संताप व्यक्त केला. उरण ओएनजीसीच्या मुख्यालयासमोरील अप्पू गेटवर प्रकल्पग्रस्तांनी जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी उरण पंचायत समितीचे सभापती नरेश घरत, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, नागाव, चाणजे, म्हातवली ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि सुमारे ५०० प्रकल्पग्रस्त या आंदोलनात सहभागी झाले होते.