लासलगाव: राज्यातील कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमधील लिलाव मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यासमोर मोठं आर्थिक संकट निर्माण होणार आहे. कांदा लिलाव प्रक्रिया बंद झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्याची शक्यता आहे. मार्च एन्डिंगचं कारण देत व्यापाऱ्यांनी लासलगावमधील कांदा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलपासून लासलगावमध्ये लिलाव सुरू होतील. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असणारा कांदा खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.
कांदा उत्पादकांची कोंडी; लासलगावात 31 मार्चपर्यंत लिलाव बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 11:32 AM