ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 20 - येथील कांदा लिलावात सहभागी होण्याचे लासलगाव बाजार समितीला सोमवारी सायंकाळी व्यापारी संघटनेने पत्र दिल्यानंतर मंगळवार पासुन लासलगाव येथील कांदा लिलाव पुर्ववत सुरू होणार असल्याची माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत होळकर यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांना दिली.सोमवारी सायंकाळी सहा वाजता लासलगाव येथील मर्चंटस असोशिएशन च्या वतीने सचिन ब्रम्हेचा , ओमप्रकाश राका , कांतीलाल सुराणा , नितीन जैन , पुरुषोत्तम चोथानी ,अजित भंडारी यांनी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत होळकर , सचिव बी.वाय.होळकर याच्यांशी चर्चा करून कोणत्याही स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली तरीही सर्वप्रथम लिलावात आणलेल्या शेतीमालाचे लिलाव करण्यात यावे .तसेच विनाकारण लिलाव बंद ठेवण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही असे सभापती जयदत्त होळकर व सचिव बी.वाय.होळकर यांनी चर्चेत सांगितले.