मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या विरोधात राज्यात सलग दुसºया दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतकरी संघटनेसह शिवसेनेनेही काही ठिकाणी आंदोलने केली. तर काँग्रेसने राज्यभरात केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन केले.काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये गळ््यात कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. पुणे, धुळे जिल्ह्यातील साक्री, कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, परभणी, औरंगाबाद, सोलापूरसह सर्व जिल्हा मुख्यालये व तालुका स्तरावर काँग्रेसने आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध केला.नाशिकला राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले होते. नांदगाव, निफाड, सटाणा, मालेगाव, न्यायडोंगरी, दिंडोरी व नाशिक शहरामध्ये आंदोलन करण्यात आले.धुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि शिवसेनेने महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत निदर्शने करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातही आंदोलन झाले....तोवर आंदोलनचालू ठेवण्याचा निर्धारकेंद्र जोपर्यत निर्यातबंदीचा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरुच राहील, असा निर्धार प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
कांदा पेटला; निर्यातबंदीच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 2:50 AM